bhavana
bhavana 
विदर्भ

Election Results : खा. भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान

सकाळवृत्तसेवा

यवतमाळ : यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदार संघातून विजयी झालेल्या उमेदवार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी खासदार भावना गवळी यांना प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे व आदी उपस्थित होते.

यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला २३ मे रोजी सकाळी 8 वाजता शासकीय धान्य गोदामात सुरूवात झाली. एकूण 30 फेऱ्यांमधील ही मतमोजणी उशिरा रात्रीपर्यंत सुरु होती. रात्री उशिरा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाणे यांनी भावना गवळी यांना. विजयी घोषित केले. भावना गवळी यांना एकूण 5 लक्ष 42 हजार 98 मते पडली. तर दुसऱ्या क्रमांकावर माणिकराव ठाकरे यांना 4 लक्ष 24 हजार 159, प्रविण पवार यांना तिसऱ्या क्रमांकाची 94 हजार 228 मते पडली.

या मतदार संघात एकूण वैध मते 11 लक्ष 74 हजार 220 तर अवैध  मते 604 असे एकूण 11 लक्ष 74 हजार 824 मतांची मतमोजणी करण्यात आली. यात पोस्टल बॅलेट पेपरच्या 4847 मतपत्रिकांचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT