navneet rana 
विदर्भ

खासदार; आमदारांचेच सँम्पल चुकत असतील तर सामान्यांचे काय? त्यांचा उद्विग्न सवाल...

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचे थ्रोट स्वॅब शुक्रवारी घेण्यात आले. परंतु रिपोर्ट आला नाही, त्यामुळे नवनीत राणा यांनी नागपूरच्या लॅबशी संपर्क साधून माहिती घेतली असता सॅम्पल चुकल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या नवनीत राणा यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधून त्यांना जाब विचारला. खासदार, आमदारांचे सॅम्पल चुकले असतील तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल करून त्यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, आमदार रवी राणा यांची प्रकृती गेल्या तीन दिवसांपासून बिघडली असून त्यांना प्रचंड ताप आल्याने शनिवारी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्‍टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत. रवी राणा यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून एक्‍स-रेसुद्धा काढण्यात आला आहे. आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचे थ्रोट स्वॅब नमुने सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या शासकीय कर्मचाऱ्यांतर्फे घेऊन पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले. रेडियंट हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांची टीम सतत आमदार रवी राणा यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे. त्यांच्यासाठी दवाखान्याचा चौथा मजला पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. या मजल्यावर केवळ आमदार रवी राणा यांना ठेवण्यात आले असून कुणालाही भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. संपूर्ण मजला निर्जंतुक करून दक्षता घेतली जात आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून  लॉकडाऊन असल्याने जिल्ह्याच्या विविध भागांतील नागरिकांना मदत देण्याच्या दृष्टीने आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी दौरे केले तसेच नागरिकांना प्रत्यक्ष मदत केली. त्यामुळे या धावपळीत आमदार रवी राणा यांची प्रकृती बिघडली.
गेल्या दोन दिवसांपासून तापाने फणफणत असतानाही त्यांनी दुखणे अंगावर काढले. त्यामुळे त्यांची प्रकृती जास्तच बिघडली, त्याकारणाने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सविस्तर वाचा - माहिती लपवून समाजाचे शत्रू बनू नका : तुकाराम मुंढे
दरम्यान, आज थ्रोट स्वॅबचा रिपोर्ट येणार होता, पण त्यांचे नमूने रिजेक्‍ट झाल्याने खासदार नवनीत राणा यांनी संताप व्यक्त करीत इर्विनच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात आपण वरिष्ठ स्तरावर तक्रार करणार असून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.
दरम्यान, खासदारांनी केलेल्या आरोपांच्या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT