MP Navneet Rana discharged from hospital 
विदर्भ

देवच पावला... खासदार नवनीत राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; २० दिवस राहणार गृहविलगीकरणात

राजू तंतरपाळे

अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्यासह आमदार रवी राणा व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली होती. तथापि, खासदार नवनीत राणा यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना आधी अमरावती, नंतर नागपूर व तेथून मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र कोरोनावर मात केल्याने खासदार नवनीत राणा यांना रविवारी (ता. १६) रात्री उशिरा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

खासदार नवनीत राणा यांना सहा ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील १२ सदस्यांनादेखील कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. कोरोना काळात खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा या दोघांनी गरीब कुटुंबीयांना मदत केली.

त्यातच त्यांनी मेळघाटात जाऊन तेथील आदिवासी बांधवांची देखील मदत केली. यातच त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य व लहान मुलांची काळजी घेताना आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दोघांनाही कोरोनाची बाधा झाली होती. आमदार रवी राणा यांना किडनीचा तर खासदार नवनीत राणा यांना फुफ्फुसाचा त्रास जाणवत होता.

त्यामुळे प्रथम नागपूर येथील वोक्हार्ट व नंतर मुंबईच्या लीलावती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारांना यश आले व प्रकृती सुधारली. शनिवारी (ता. १५) मध्यरात्री आमदार रवी राणा यांना लीलावती रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर त्यानंतर एक दिवसाने रविवारी (ता. १६) रात्री उशिरा खासदार नवनीत राणा यांना सुटी देण्यात आली.

परंतु अशक्तपणामुळे बेडरेस्टसह पुढील २० दिवस गृहविलगीकरणात (होम आयसोलेटेड) राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यामुळे खासदार नवनीत राणा या पुढील वीस दिवस मुंबईतील आपल्या निवासस्थानी बेडरेस्टसह गृहविलगीकरणात राहणार आहेत. या कठीण काळात उपचार करणा-या सर्व डॉक्टर्स-आरोग्यसेवक, आरोग्य कर्मचारी, आस्थेने विचारपूस करणारे विविध राजकीय नेते, चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करणारे सर्व हितचिंतक पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक बंधू-भगिनींचे, प्रसार माध्यमे या सर्वांचे आभार आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी मानले आहे.

फेसबुक व्हिडिओद्वारे दिली माहिती

दोनच दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी फेसबुक व्हिडिओवरून लीलावती रुग्णालयाच्या आयसीयूमधून बाहेर आल्याचे सांगितले होते. अनेक लोक माझ्यासाठी चिंता करीत होते, प्रार्थना करीत होते. या प्रार्थनांमुळे मी मरता मरता वाचले. माझी प्रकृती ठीक आहे. देवाने मला पुन्हा एक संधी दिली पाहिजे, अशी मी प्रार्थना करीत होते. कारण मला माझ्या लोकांसाठी काम करायचं आहे. आपल्या आशीर्वादामुळे मी आज वाचले. सगळ्यांचे धन्यवाद, असे त्यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.

आत्मविश्वासाच्या बळावर मात

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड आत्मविश्वास या बळावर खासदार नवनीत यांनी कोरोनावर मात केली. त्यांच्या स्वास्थविषयक नाजूक काळात त्यांचे सर्वधर्मीय-सर्वजातीय पदाधिकारी-कार्यकर्ते-हितचिंतक व स्नेहीजन यांनी आपआपल्या श्रध्दास्थळावर आमदार रवी राणा-खासदार नवनीत राणा यांची प्रकृती सुधारण्यासाठी मनोभावे प्रार्थना केली होती. आज त्या प्रार्थना सत्कारणी लागल्या. कोरोनासारख्या या महाभयंकर आजारावर मात करून नवनीत रवी राणा या आता जणू मृत्यूच्या दारातून परत आल्या आहेत. जीवन-मरणाच्या संघर्षात त्यांना न्याय मिळाला.

संपादन - अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटातल्या गूढ अपघाताचा उलगडा… कोकणातून हॉटेल चालकाचा फोन ठरला टर्निंग पाईंट! नाहीतर...

Kolkata Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने कोलकाता हादरले; लोक घाबरून घरं सोडून पळाले; बांगलादेशातही बसले हादरे

Television Day 2025: स्क्रीनवरचे डाग होतील गायब! ‘या’ 3 उपायांनी करा टीव्हीची परफेक्ट स्वच्छता

Latest Marathi News Live Update : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी आज उमेदवारांना माघारीची अखेरची मुदत

Ashes 2025 England vs Australia : खरोखरची राख असलेली 'अ‍ॅशेस ट्रॉफी' आता कुठं आहे? त्यात नेमकी कशाची राख आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT