MP Navneet Rana got threat Letter  
विदर्भ

"ज्या चेहऱ्यावर तू घमंड करते तो चेहरा ऍसिड टाकून विद्रूप करून टाकू"; खासदार नवनीत राणा यांना धमकी 

सकाळ डिजिटल टीम

अमरावती ः अमरावतीच्या खासदार नवनीत राणा तसेच त्यांचे पती तथा आमदार रवी राणा यांना धमकीचे पत्र आल्याची तक्रार त्यांनी केली असून या प्रकरणाने चांगलीच खळबळ उडाली आहे.

8 फेब्रुवारीला राष्ट्रपतींच्या अभीभाषणावर अभिनंदनाच्या प्रस्तावावर मी बोलत होती. गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या कमींची माहिती मी संसदेत सांगितली. गेल्या दहा महिन्यांपासून लोकांचे काय मत आहे, हेसुद्धा मी त्या ठिकाणी सांगितले. संविधानाने मला बोलण्याचा अधिकार दिला आहे. सरकारची कमी सांगणे हे माझे कर्तव्य होते, त्यामुळे ती माहिती मी दिली, असे नवनीत राणा यांनी सांगितले.

दरम्यान, दुसऱ्याच दिवशी मला एक पत्र मिळाले. ज्या चेहऱ्यावर तू घमंड करते तो चेहरा ऍसिड टाकून विद्रूप करून टाकू, अशी धमकी त्या पत्रात होती. तुमचे पती तथा आमदार रवी राणा यांनासुद्धा ज्या पद्धतीने आम्ही अन्य लोकांशी वागतो तशाच पद्धतीने त्यालाही वागणूक दिली जाईल. तुम्हाला फिरण्याच्या लायकीचे सोडणार नाही, अशी धमकीसुद्धा त्या पत्रातून देण्यात आल्याचे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले. 

या पत्राच्या बाबतीत संसदेच्या पोलिस ठाण्यात तसेच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे, असे खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: राजगड सहलीवर काळाचा घाला! पाबे घाटात ट्रॅव्हल बस ४० फूट दरीत; दोन ठार, 19 जण जखमी..

Mumbai Crime: पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद पेटला, कोयता उपसला अन्...; सीएसएमटीबाहेर थरारक घटना

Bride Theft Case : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू भावोजीसोबत फरार, पोलीस तपासात खळबळजनक सत्य उघड; पतीसह कुटुंबाला मोठा धक्का !

Latest Marathi News Update : पंढरपुरात पावसाची दमदार हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

Samruddhi Road Accident : चिमुरडीचं हसू कायमचं हरपलं! समृद्धी महामार्गावर एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत, थरकाप उडवणारा अपघात

SCROLL FOR NEXT