Navneet Rana 
विदर्भ

व्वा क्या बात है! खासदार नवनीत राणांनी केली चक्क शेतात पेरणी...

सकाळ वृत्तसेवा

अमरावती  : पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. मशागत करून तयार केलेल्या शेतात बळीराजा आपली मेहनत व परिश्रमाने बियाणे पेरतो आणि त्याला आपल्या घामाने रुजवितो. त्यामुळे बळीराजाला हे वर्ष सुखाचे समाधानाचे व समृद्धीचे जाओ, या प्रार्थनेसह खासदार नवनीत रवी राणा यांनी सोमवारी (ता. 15) स्वतः शेतात जाऊन पेरणी केली. 

धुरकरी व महिलांचा सत्कार

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू झालेल्यालॉकडाउनमुळे संपूर्ण देश चिंताग्रस्त व संकटात असताना देशवासीयांना जगविण्याचे काम शेतकऱ्यांनी केले. सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली, परंतु ही घोषणा घोषणाच राहिली. आता शेतकऱ्यांना पेरणीसाठी खासगी सावकारांच्या दारात जावे लागत आहे. बॅंकांनी हात वर केले आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने हंगामाच्या तयारीला लागावे, ईश्‍वराने त्यांना आशीर्वाद द्यावा, असे साकडे घालून खासदार नवनीत रवी राणा यांनी नवीन हंगामाच्या पेरणीला प्रारंभ केला. यावेळी बैलजोडीचे पूजन करून धुरकरी व महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी शेतात राबणाऱ्या शेतमजूर महिला व पुरुषांना किराणा वाटप केले.

काहीही झाले तरी आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू व शेतकरी, शेतमजुरांच्या हक्कासाठी सदैव लढत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश साबळे, मयूरा कावरे, युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, विनोद जायलवाल, अवी पाटील, सचिन साबळे, अमोल सिंगलवार, अवी काळे, अनुप अग्रवाल, अभिजित देशमुख, खूष उपाध्याय, पद्मा भटकर, सचिन बोंडे, मंदा छापाणे, प्रियांका सवाई, शुभम उंबरकर, राहुल काळे आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT