mp navneet rana statement on sachin waze case in amravati 
विदर्भ

VIDEO : 'सचिन वाझेंच्या जीवाला धोका, महाराष्ट्रात मोठा भूकंप होण्याची ठाकरे सरकारला भीती'

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : 'एनआयएने सचिन वाझे यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवले नाहीतर सचिन वाझेंचा मनसुख हिरेन होण्यास जास्त वेळ लागणार नाही. त्यांच्या जीवाला धोका असून एनआयएने त्यांना संरक्षण द्यावे. येत्या काही दिवसांत मातोश्रीपर्यंत जातात अशा महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांचे नाव या प्रकरणामध्ये समोर येणार आहे. बड्या नेत्यांचा यामध्ये समावेश असेल. तसेच येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याची भीती ठाकरे सरकारला आहे, असे धक्कादायक विधान खासदार नवनीत राणा यांनी केले.  

'मनसुखे हिरेन यांच्या प्रकरणात सचिन वाझे हे तपास करत होते. त्यांना एनआयएकडून चौकशीसाठी बोलाविण्यात आले. त्यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती मिळाली.  त्यांची चौकशी झाली म्हणून मुंबई पोलिस आयुक्तांची बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिस आय़ुक्त पदावरून हटविण्यात आले. याप्रकरणामागील सत्य सचिन वाझे सांगतील, अशी भीती ठाकरे सरकारला आहे. त्यामुळे राज्यात खूप मोठा राजकीय भूकंप देखील होऊ शकतो', असेही राणा म्हणाल्या. 

महाराष्ट्र सरकार यामध्ये सहभागी नाहीतर मुंबई पोलिस आयुक्तांची बदली का करण्यात आली? सहभागी असेल म्हणूनच पोलिस आय़ुक्तांची बदली करण्यात आली, असा सवालही नवनीत राणा यांनी उपस्थित केला. 

सचिन वाझेंचा एनआयए तपास करत असून एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझेंच्या घराची झडती घेतली आहे. या झडतीत अधिकाऱ्यांनी दोन सदरे जप्त केले आहेत. गुन्ह्या दरम्यान त्यांनी या दोन्ही सदराचा वापर केला होता. एनआयएला तपासात मिळालेल्या माहितीनुसार, गुन्ह्यात  पीपीई किट नव्हता, तर तो पांढरा कुर्ता होता.  CCTV मध्ये तो PPE किट वाटत होता. मात्र आरोपीनं संपूर्ण अंग झाकण्यासाठी पांढऱ्या रंगाचा सदरा घातला होता. त्यानंतर एनआयएनं त्या अँगलनं तपास सुरू केला होता. 

गुन्ह्यात वापरले दोन सदरे NIA च्या अधिका-यांनी जप्त केले आहेत. सचिन वाझे यांनी त्यातला एक सदरा मुलूंड टोलनाक्याजवळ केरोसीनने जाळला होता. तसंच काल रात्री वाझेंच्या घराच्या झडतीत एक कार जप्त केली आहे.  कारमध्ये काही महत्वाचे पुरावे सापडले आहेत. दरम्यान, अन्य इतर तीन कारचा शोध NIA कडून सुरू आहे. 
वाझेंसोबत जो दुसरा व्यक्ती कटात होता त्याचाही शोध लागला असून तो सध्या NIA च्या ताब्यात आहे. ती व्यक्ती पोलिस दलातील असल्याची माहिती NIA सुत्रांनी दिली आहे. तसंच हा संपूर्ण कट पब्लिसीटीसाठी केला असल्याची दाट शक्यता NIA ला आहे. 

कोण आहेत सचिन वाझे? 

1990 मध्ये सेवेत दाखल झालेल्या वाझे यांनी 63 गुंडांना यमसदनी धाडले होते. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात उपनिरीक्षक पदापासून झाली. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त परिसरातून सेवेची सुरूवात करणा-या वाझे  ठाणे पोलिस दलात आपल्या कामामुळे प्रसिद्धीला आले. 2002 घाटकोपर स्फोटातील संशयित आरोपी ख्वाजा युनुस कोठडीतील संशयीत मृत्यूप्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी शिवसेना पक्षातही प्रवेश केला होता. ख्वाजा युनुस प्रकरणी वाझे यांच्यासह 1

पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पुढे न्यायालयीन प्रक्रियाही चालली. वाझे यांच्यासर इतर विभागाच्या प्रभारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

संपादन - भाग्यश्री राऊत
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT