navneet rana 
विदर्भ

Video: खासदार पत्नी आमदार पतीचे केस कापतात तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : घरगुती महिला असो की राजकारणी स्त्री. पत्नी ही पत्नीच असते. टाळेबंदीच्या काळात हजामत करणारा न मिळाल्याने पतीचे केस वाढलेले पत्नीला रुचले नाही आणि तिने स्वत:च कैची हातात घेऊन पतीची कटिंग करून दिली. ही महिला कोणी साधीसुधी स्त्री नसून चक्क खासदार नवनीत राणा आहेत.
 गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउन असल्याने सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच प्रतिष्ठितांनाही कटिंग करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी त्यांचे पती व बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांचे घरीच केस कापले. खासदारांनी हातात कैची व कंगवा घेऊन केलेल्या या कटिंगचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाउन आहे. माझे पती आमदार आहेत. मी त्यांना विनंती केली की कुणाला तरी बोलावून केस कापून घ्या, परंतु कुणाला बोलविणे सध्याच्या स्थितीत रिस्क असल्याने त्यांनी नकार दिला. त्यांचे म्हणणेसुद्धा योग्यच आहे. त्यांनी आग्रह धरल्याने मीच हातात कैची घेतली. पहिल्यांदाच केस कापत आहे, खासदार आमदारांची कटिंग करीत आहे. कटिंग झाल्यावर आमदार घराबाहेर पडतील किंवा नाही हे पाहू, असे सांगून खासदार नवनीत राणा यांनी या कटिंगला सुरुवात केली. जास्त केस कापायचे नाहीत, असा सल्ला सुद्धा त्यांनी इतरांना दिला.
आमदारांचे केस खूप वाढले होते. त्यांना मी अशा स्थितीत पाहू शकत नव्हते. विविध ठिकाणी बैठका तसेच नागरिकांच्या मदतीसाठी ते जातात, त्यामुळे मी हा निर्णय घेतला, असे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले.

सविस्तर वाचा - ...आणि आयुक्त तुकाराम मुंढे पोचले जनतेत; केले हे आवाहन
विशेष म्हणजे खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा कोरोनाच्या या काळात सातत्याने बाहेर राहून नागरिकांना मदतीचा हात देत आहेत. गरजुंना जीवनावश्यक वस्तू देण्यासोबतच त्यांच्या जेवणाची व्यवस्थासुद्धा या दाम्पत्याने केली आहे. या सोबतच त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. या व्यस्ततेत तसेच लॉकडाउन असल्याने आमदार रवी राणा यांचे केस चांगलेच वाढले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT