Nilesh Bante e sakal
विदर्भ

तमाशा कलाकाराचा मुलगा MPSC उत्तीर्ण, पण मुलाखतीपूर्वीच मृत्यूशी संघर्ष

सकाळ वृत्तसेवा

निलज बु (जि. भंडारा) : तमाशा कलाकाराचा मुलगा नीलेश रमेश बांते (वय 26) आपल्या कर्तृत्वाच्या बळावर एमपीएससी (MPSC) पूर्व व मुख्य परीक्षा उत्तम गुणांनी पास झाला. त्याला मुलाखतीत बाजी मारून आई-वडिलांसोबत गावचे नाव मोठे करण्याचा आत्मविश्वास होता. परंतु, काळाने घात केल्याने अपघातात त्याच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली आहे. त्याचा रुग्णालयात मृत्यूसोबत संघर्ष सुरू आहे. यामुळे जीव वाचला तरी, तो मुलाखतीला मुकणार, अशी चिंता निर्माण झाली आहे.

दसऱ्याच्या दिवशी निलज येथील सहा मित्र डोंगरगढ येथे देवदर्शनासाठी जाण्यास निघाले. परंतु, तिरोडा तालुक्यात सरांडीजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला तर, चौघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यापैकी नीलेश रमेश बांते (वय 26) गंभीर जखमी झाला. दुखापत झाल्याने त्याचे दोन्ही हात निष्क्रिय झाले आहेत. चेहऱ्यावरही गंभीर जखमा झाल्या आहेत. चार दिवसांपासून तो गोंदिया येथील खासगी रुग्णालयात सुन्न अवस्थेत खाटेवर पडून आहे.

निलज बु. येथील हाच नीलेश पहिल्यांदा एमपीएससीची पूर्व व मुख्य परीक्षेत पास झाला आहे. त्याने पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण गावातच घेतले. प्रत्येक स्पर्धेत अव्वल येणाऱ्या नीलेशची प्रगती पाहून त्याच्या वडिलांनी त्याला तुमसर शहरातील जनता विद्यालयात पाठवले. दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने शहापूर येथे नानाजी जोशी महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतले. नीलेश दहावी व बारावीच्याही गुणवत्ता यादीत झळकला. नंतर त्याने वडिलांच्या आग्रहापोटी अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. उत्तम गुणांमुळे त्याची निवड शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती येथे स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत बी-टेक अभ्यासक्रमासाठी झाली. उत्तम गुणांनी त्याने 2018 मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयातील कॅम्पसमध्ये मिळालेली चांग्लाय पगाराची खासगी कंपनीतील नोकरी सोडून त्याने शासकीय सेवेत जाण्यासाठी तयारी करण्याचा मार्ग निवडला. नंतर पुण्यात त्याने लहान-मोठ्या ठिकाणी काम करून स्वतःच्या शिक्षणाचा व पोटापाण्याचा प्रश्न मिटवला. सोबतच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेची तयारी सुरू केली. दिवसभर अभ्यासिकेत बसून अभ्यास व रात्री कॉल सेंटरमध्ये काम करून तो दिवस काढत होता. 2019 मध्ये एमपीएससी परीक्षा पास करून तो गावातून पूर्व व मुख्य परीक्षेपर्यंत पास होणार पहिला विद्यार्थी ठरला. कोरोनामुळे एमपीसीच्या मुलाखती मागील दीड वर्षापासून झाल्या नाहीत. आता नोव्हेंबर महिन्यात नीलेशला मुलाखतीकरिता जायचे होते. पण, तो जाऊ शकेल काय? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

घरची बेताची परिस्थिती -

नीलेशच्या वडिलांची परिस्थिती तशी बेताचीच आहे. ते अल्पभूधारक शेतकरी असून अंगात असलेल्या कलेमुळे गावागावात होणाऱ्या मंढई व जत्रांमध्ये तमाशातून कला सादर करतात. परंतु त्यांनी नीलेशच्या मनात निर्माण केलेल्या जिद्दीच्या बळावरच त्याने या यशापर्यंत मजल मारली आहे. मात्र, अपघातामुळे ऐन शिखरावर चढण्याच्या वेळी तो रुग्णालयात पडून आहे.

सहा शस्त्रक्रिया; मदतीचा ओघ सुरू -

नीलेशच्या हातांना, खांद्यांना व तोंडाला गंभीर इजा झाल्याने त्याच्यावर सहा ते सात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. एवढा मोठा खर्च कसा करावा, हा प्रश्न त्याच्या कुटुंबासमोर उभा आहे. अशात गावकरी व त्याचे मित्र या दुःखाच्या वेळी मदतीसाठी धावून आले आहेत. त्यांनी विविध माध्यमातून लोकांकडून पैसे गोळा करायला सुरुवात केली आहे. यातून खऱ्या माणुसकीचे दर्शन घडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT