mpsc student manoj kadam started maitriche pohe stall in amravati 
विदर्भ

MPSC च्या परिक्षेला 'मैत्रीचे पोहे' ठरतायत आधार.... 

ऋषिकेश नळगुणे

अमरावती - प्रत्येक यशस्वी ठरलेल्या किंवा ठरणार असलेल्या माणसाच्या आयुष्यात वेटिंग पिरीयड असतोच असतो. या काळातील दुःख ज्याची त्यालाच माहित असतात. याच वेटिंग पिरीयडला माणसानेच संघर्ष ऐसे नाव दिले. तो कधीच कोणाला चुकला नाही. फक्त ज्याच्या-त्याच्या संघर्षाच्या व्याख्या निराळ्या. जो तो आपआपला जगत असतो, अनुभवत असतो. 

अशाच एका संघर्षाशी गाठ बांधलेल्या तरुणाचे नाव मनोज कदम. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील हिवरखेड हे अवघ्या साडेतीन ते चार हजार लोकवस्तीच त्याच छोटसं गांव. दोन वर्षापुर्वी मास्टर आँफ सोशल वर्क हा कोर्स पुर्ण केले. मात्र पुढे त्यामध्येच करिअर न करता त्याने स्पर्धा परिक्षा देवून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. मग हेच स्वप्न उराशी घेवून अभ्यासासाठी तो अमरावतीमध्ये दाखल झाला. तेव्हापासून जीवतोड अभ्यास करतोय, पण यश हाती लागले नाही. एकदा तर अगदी थोडक्यात यशाने हुलकावणी दिल्याचे त्याने सांगितले. 

पण त्याच्या पदरी नकारच

हळू हळू दोन वर्ष सरली तरी यश मिळत नसल्याने घरुन दबाव येण्यास सुरवात झाली. आधीच घरची परिस्थिती बिकट त्यात अधिकारी तर व्हायचंय. त्यामुळे आता उदरनिर्वाहासाठी पार्टटाईम जाॅबची शोधाशोध सुरु झाली. मागील तीन-साडेतीन महिन्यापासून जाॅबसाठी कित्येक उंबरठे झिजवले पण प्रत्येक ठिकाणी त्याच्या पदरी नकारच पडला. 

अन् ठरलं, संघर्षाचे दुसरे नाव मैत्रीचे पोहे

अखेरीस मनोजचा वकील मित्र अंकुश याने त्याला कांदे-पोहे स्टाॅल चालू करण्याचा सल्ला दिला. कोणतेही आढेवेढे न घेता, न लाजता मनोजने देखील तो मान्य केला. नुसता सल्ला न देता अंकुशने मनोजला पैशांची देखील मदत केली. त्यामुळे गाडीला नाव दिले मैत्रीचे पोहे...! रोज सकाळी ६ ते ११ पर्यंत जिल्हाधिकारी ऑफीसच्या बाहेर पोहे विकायचे. आणि त्यानंतर दिवसभर स्वयंअध्ययन असा मनोजचा दिनक्रम सुरु आहे. दिवसाकाठी ३०० ते ३५० रुपये सुटतात व त्यातुन पुस्तके आणि राहण्यचा व जेवण खर्च निघतो. असे मनोजने सांगितले. 

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. घरची बेताची परिस्थीती, उरनिर्वाहाचा प्रश्न, वाढत वय आणि न मिळणार यश या सगळ्या खचवणाऱ्या प्रतिकुल परिस्थीतीने अशा अनेकांना आज खिंडीत गाठले आहे. तरीही पोटाला चिमटे घेवून ते सकाळपासून रात्रीपर्यंत लोकसेवा आयोगाच्या परिक्षांची तयारी करित आहेत. 

असे अनेक मनोज रोज संघर्षाला जवळ करतात

खचून न जाता छातीचा कोट करुन अभ्यासातील सातत्य आणि कठोर परिश्रमाद्वारे प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची हिंमत असल्याचेही असेच अनेक मनोज सांगतात. त्यामुळे मग कोण सकाळी पेपर टाकणे, चहाचा स्टाॅल चालवणे, भाजी विकणे, दुध विकणे, दुकानात कामाला जाणे किंवा ते अगदी न लाजता हाॅटेलमध्ये पार्टटाईम वेटर म्हणून काम करणारीही उदाहरणे आहेत. 

त्यामुळे लोकसेवा आयोगाच्या अनिश्चिततेच्या वाटेवर चालताना जसे मनोजने पोहे बनविण्याचे कौशल्य शिकुन घेतले आहे, त्याचप्रमाणे इतर विद्यार्थ्यांनी जगण्यासाठी दुसरे कसब आणि कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andre Russell Retirement: वेस्ट इंडिजचा 'ऑलराउंडर' आंद्रे रसेलने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर!

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT