abc  
विदर्भ

तब्बल पाचशे अंगणवाड्यांवर कोसळणार महावितरणची वीज? बिलाचे तब्बल 47 लाख थकीत

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यातील तब्बल 515 अंगणवाड्यांकडे 46 लाख 97 हजार 918 रुपयांचे वीजबिल थकीत आहे. वीजबिलाचा भरणा करावा, असे पत्र महावितरण कंपनीकडून संबंधित विभागाला पाठविण्यात आले आहे. वीजबिलाचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित केल्या जाण्याची शक्‍यता आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च 2020 मध्ये लॉकडाउन करण्यात आले होते. याकाळात घरगुती, औद्योगिक, कृषी ग्राहकांचे मीटररिडींग तसेच वीजबिल वसुली बंद होती. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे वीजबिल सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडे थकीत होते. वारंवार आवाहन केल्यानंतरदेखील ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा केला नाही. परिणामी, महावितरणने फेब्रुवारी महिन्यापासून वसुली मोहीम राबविण्यास सुरुवात केली. 

मोहिमेनंतर महावितरणाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बहुतांश ग्राहकांची समजूत काढली. यानंतर जवळपास नऊ हजारांवर ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा केला. यानंतरही वीजबिल वसुली मोहीम सुरू होती. मात्र, वसुली मोहिमेला विरोध झाल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वसुली थांबवीत असल्याची घोषणा विधिमंडळात केली. तेव्हापासून मोहिम थांबविण्यात आली आहे. 

या प्रकारामुळे महावितरण कंपनीसमोर प्रचंड अडचणी वाढल्या आहेत. तोट्यात आलेल्या महावितरणने आता शासकीय कार्यालयाकडील वीजबिलाचा भरणा करावा, याकरिता पत्रव्यवहार सुरू केला आहे. या निर्णयानुसार जिल्हा परिषद प्रशासनाला अंगणवाड्यांचे थकीत वीजबिल भरावे, असे पत्र पाठविले आहे. 

जिल्ह्यातील 515 अंगणवाड्यांकडे 46 लाख 97 हजार 918 रुपयांचे वीजबिल थकीत आहे. याबाबत त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या काळात अंगणवाड्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाण्याची शक्‍यता आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RR Live : मुंबई इंडियन्स-राजस्थान रॉयल्स सामना होण्याची शक्यता कमी, थेट गुवाहाटीवरून अपडेट्स, मॅच रद्द झाल्यास काय?

Nashik SIT Press: रुपाली चाकणकरांची चौकशी का नाही? नाशिकमध्ये एसआयटीची पत्रकार परिषद; तेजस्वी सातपुतेंचं स्पष्ट शब्दांत उत्तर

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातून ड्रग्स जोपर्यंत हद्द हद्दपार होणार

लासलगावच्या हापूसला ‘न्यूयॉर्क’ची हाक; भाभा अणुसंशोधन केंद्र विकिरण प्रक्रियेमुळे पहिल्यांदाच थेट अमेरिकेत निर्यात

IPL 2400 crore loss: आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा फटका बसतोय, पण कसा? मोदीने गणित समजावून सांगितलं

SCROLL FOR NEXT