file phote 
विदर्भ

मुंबई दुरांतो रद्द

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मुसळधार पावसामुळे बुधवारी मुंबईची तुंबापुरी झाली. त्याचा फटका रेल्वे वाहतुकीलासुद्धा बसला आहे. गुरुवारी नागपूरहून रवाना होणारी मुंबई दुरांतो एै ृनवेळी रद्द करण्यात आली. सोबतच नागपूरमार्गे मुंबईकडे रवाना झालेल्या रेल्वेगाड्या पूर्वीच थांबवून घेण्यात आल्या आहेत. त्यातील विदर्भ, शालीमार व गीतांजली एक्‍स्प्रेससह एकूण पाच गाड्या थांबविलेल्या ठिकाणावरूनच परतीच्या प्रवासाला निघतील. याशिवाय दोन गाड्या नियोजित वेळेपेक्षा विलंबाने सोडण्यात येणार आहेत. गुरुवारी रात्री 8.40 वाजता नागपूर स्थानकाहून रवाना होणारी नागपूर - मुंबई दुरांतो रद्द करण्याची घोषणा सायंकाळी करण्यात आली. गाडीच्या 645 प्रवाशांना अचानक गाडी रद्द करण्यात आल्याचे मॅसेज प्राप्त झाले. तिकीट रद्द करण्यासह अधिक माहिती देण्यासाठी नागपूर स्थानकावर विशेष बुथ सुरू करण्यात आले होते. 12859 मुंबई-हावडा गीतांजली एक्‍स्प्रेस गुरुवारी नाशिक रोड येथून रवाना झाली. बुधवारी रवाना झालेली 12106 गोंदिया-मुंबई विदर्भ एक्‍स्प्रेस भुसावळपर्यंतच धावली. यामुळे 12105 मुंबई-गोंदिया विदर्भ एक्‍स्प्रेस भुसावळ येथूनच रवाना झाली. 18029 लोकमान्य टिळक टर्मिनस-शालीमार एक्‍स्प्रेस आज इगतपुरी येथून रवाना झाली. 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्‍स्प्रेसला आज नाशिक रोड येथेच थांबविण्यात आले. याशिवाय बुधवारी रवाना होणारी 12261 मुंबई-हावडा दुरांतो एक्‍स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा सहा तास उशिरा आज रवाना झाली. बुधवारी रवाना होणारी 12289 मुंबई-नागपूर दुरांतो एक्‍स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा 6 तास 40 मिनिटे उशिरा रवाना झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking Kolhapur Politics: आमदार राहुल आवाडे यांच्या मुलीनंतर पत्नी मोसमी आवाडेही जिल्हा परिषदेच्या रिंगणात, राजकीय वर्तुळात खळबळ

Youtube News : यूट्यूबच्या हेल्थ टिप्स फॉलो करताय? 19 वर्षीय तरुणी व्हिडीओ पाहून वजन कमी करायला गेली अन् गमावला जीव, नेमकं काय घडलं?

Railway Rules: रेल्वेत दारूची बाटली नेल्यास होऊ शकते कडक शिक्षा…नियम काय आहेत? वाचा एका क्लिकवर

आप्पाचा विषय लै हार्ड हाय! 'पुणे ग्रँड टूर स्पर्धेत' आजोबांचीच हवा, देशी सायकलीवरुन फिरतानाचा Viral video

Latest Marathi News Live Update : नांदेडच्या कंधारमध्ये गाळेधारक आणि भाजीपाला विक्रेत्यांमध्ये वाद

SCROLL FOR NEXT