विदर्भ

शेतीच्या वादातून मोठ्या भावाचा खून; लहान भावास अटक

सकाळ वृत्तसेवा

मूल (जि. चंद्रपूर) : वडिलोपार्जित शेतीच्या हिस्सेवाटणीचा जुना वाद उफाळून आल्याने लहान भावाने मोठ्या भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. ही खळबळ जनक घटना तालुक्यातील सिंताळापासून १ किमी अंतरावर असलेल्या येरगाव मार्गावरील नाल्याजवळ बुधवारी (ता. ४) सकाळी साडेअकरादरम्यान घडली. आरोपीने स्वतःच मूल पोलिस ठाणे गाठले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील पुंजाराम वैरागडे (वय ४२) असे आरोपीचे नाव आहे. तर खून झालेल्या मोठ्या भावाचे नाव विश्वनाथ पुंजाराम वैरागडे (वय ६५) आहे. सिंताळा येथील विश्वनाथ वैरागडे आणि सुनील वैरागडे या सख्ख्या भावांमध्ये वडिलोपार्जित शेतीचा वाद सुरू होता. हिस्सेवाटणीवरून अनेकदा खटके उडत होते. याबाबत मूल पोलिस ठाण्यात २०१९ मध्ये या दोन भावांबाबत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद आहे.

बुधवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान विश्वनाथ हे जंगलात जनावरे चरावयासाठी नेत असताना पाठीमागून येऊन सुनीलने कुऱ्हाडीने डोक्यावर वार केले. कुऱ्हाडीचा जबर मार लागल्याने विश्वनाथ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. येरगाव मार्गावर खून झाल्याची माहिती गावात पोहोचली. घटनास्थळी नागरिकांचा जमाव झाला. घटनेनंतर आरोपी सुनीलने स्वतःच मूल पोलिस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली.

सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत ठवरे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. दरम्यान, तपासानंतर आरोपी सुनील वैरागडेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तपास सहायक पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत ठवरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT