विदर्भ

कोरोनानिर्बंधांत रक्ताच्या नात्यावर वार; सलग दोन खुनांनी समाजमन चिंतित

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : कोरोनापासून (coronavirus) प्रत्येकाचा जीव वाचविण्यासाठी शासन व प्रशासन दिवसरात्र राबत आहे. नागरिकांनी घरात सुरक्षित राहावे, ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, कोरोना निर्बंधात रक्ताच्या नात्यावरच वार करून खात्मा (murdere) केला जात आहे. घाटंजी व झरी तालुक्यांमध्ये घडलेल्या सलग घटनांनी समाजमन चिंतित झाले आहे. (Murder of two in Yavatmal district)

घाटंजी तालुक्‍यातील पारवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या झापरवाडी येथे मुलाने वडिलांचा खून केला. महादेव बापूराव गेडाम (वय ६०) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी मारुती महादेव गेडाम (वय ३०) याला अटक केली. या घटनेची शाई वाळत नाही, तोच झरीजामणी तालुक्‍यातही खुनाची घटना घडली.

कौटुंबिक कलहातून रागाच्या भरात मुलाने वडिलांच्या छातीत सुरा भोसकून खून केल्याची घटना घडली. नथ्थू केशव आसुटकर (वय ४८, रा. भंडाळा) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी वैभव आसुटकर (वय १९) याला अटक केली. कोरोनाच्या कडक निर्बंधांत कुटुंबाला एकत्र राहण्यासाठी वेळ मिळाला. मात्र, त्यात वादाची ठिणगी अधिक प्रमाणात पडत आहे. हाताला काम नसणे, एकाच ठिकाणी बंदिस्त राहावे लागत असल्याने तरुणाईची मानसिकता धोक्‍यात येत असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.

(Murder of two in Yavatmal district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Marriage: ''राहुल गांधींचं लग्न झालंय, मुलंबाळंही आहेत'', ज्योतिषाने सगळंच सांगितलं; बायको कुठे असते?

WPL 2026: स्मृती मानधना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात दाखल; कसे आहे RCB चे संपूर्ण वेळापत्रक?

Post Office Scheme : नवीन वर्षात व्याजदर जाहीर! ‘ही’ पोस्ट ऑफिस योजना करेल मालामाल; जाणून घ्या सर्व योजनांवरील व्याजदर

Latest Marathi News Live Update : फक्त शिव्या देणे हा विरोधकांचा अजेंडा आहे- अशोक चव्हाण

Kolhapur Market : आठवडा बाजारात भाजीपाला स्वस्त; टोमॅटो पन्नाशीवर, गृहिणींना दिलासा

SCROLL FOR NEXT