Murder of a retired soldier due to his wifes immoral relationship wardha crime news 
विदर्भ

पत्नीच्या अनैतिक संबंधातून सेवानिवृत्त जवानाचा खून; पती लवकर घरी आल्याने घडला थरार

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : येथील नागठाणा शिवारात शनिवारी (ता. २०) सेवानिवृत्त जवान विजय गणवीर यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्‍त करण्यात आल्याने पोलिसांनी तपास केला असता त्यांचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे उघड झाले आहे. यात मृताच्या पत्नीसह तिचा प्रियकर रामेश्‍वर आघाव आणि एका सहकारी महिलेला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त जवान विजयच्या पत्नीचे बोरगाव येथील रामेश्वर आघाव याच्याशी सूत जुळले होते. शनिवारी विजय नागपूर येथे सैनिक कॅन्टीनमध्ये खरेदीसाठी गेला होता. विजय नेहमी उशिरा येत असल्याने तिने रामेश्वरला घरी बोलावून घेतले. एरवी उशिरा येणारा विजय शनिवारी दुपारीच घरी आला. पत्नीला परपुरुषासोबत पाहून त्यांच्यात वाद झाला. दरम्यान, जाडसर वस्तूने डोक्‍यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. यातच विजयचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृत विजयच्या पत्नीला ताब्यात घेतले. चौकशी केली असता रामेश्वर आघाव तसेच संध्या जोगे यांच्या मदतीने हे घडवून आणल्याचे सुनीता हिने चौकशीत कबुली दिली. प्रकरणी तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT