Murder of wife's lover crushed by stone in Wardha  
विदर्भ

दगडाने ठेचून पत्नीच्या प्रियकराचा खून, वर्धा जिल्हा हादरला

रूपेश खैरी

वर्धा  : प्रेमसंबंधातून पतीने पत्नीच्या प्रियकाराचा दगडाने ठेचून खून केला. ही खळबळजनक घटना बुधवारी (ता. 12) मध्यरात्रीच्या सुमारास नागठाणा परिसरात घडली. कैलास ढुमणे (रा. मोहा, जि. यवतमाळ), असे मृताचे तर विलास ऊर्फ बाल्या कासार (रा. कळंब, जि. यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कैलास ढुमणे हा आरोपी विलास कासार याच्या पत्नीसोबत मागील काही दिवसांपासून वर्ध्यात आला होता. आपली पत्नी कैलाससोबत वर्ध्यात राहत असल्याची माहिती विलास कासार याला मिळाली. विलासने थेट वर्धा गाठून पत्नी राहत असलेल्या ठिकाणी गेला. दरम्यान, तेथे तिघांनीही एकमेकांसोबत चर्चा केली. त्यानंतर विलास कासार, कैलास ढुमणे आणि विलासची पत्नी हे तिघेही पायी नागठाणा रस्त्याने धोत्रा (रेल्वे) येथे जाण्यास निघाले. 

मात्र, पाऊस सुरू झाल्याने तिघांनीही रस्त्यावरील एका ढाब्याचा आसरा घेतला. तिघांनी तिथे जेवण केले. पण, पाऊस सुरूच होता. तिघांनी तिथेच मुक्‍काम करण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्रीच्या सुमारास कैलास ढुमणे आणि विलासची पत्नी गाढ झोपेत असताना मनात राग धरून असलेल्या विलास ऊर्फ बाल्या कासार याने रस्त्याकडेला असलेल्या मोठ्या दगडाने कैलासच्या चेहऱ्यावर दगडाने ठेचून त्याचा खून केला. हा प्रकार बघताच विलासच्या पत्नीने आरडाओरडा केली. दरम्यान, विलास कासार याने तेथून पळ काढला.

रामनगर परिसरात खळबळ

परिसरातील नागरिकांना ओरडण्याचा आवाज आला असता नागरिक घराबाहेर आले. त्यांना कैलास ढुमणे हा रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. त्यातील एका नागरिकाने रामनगर ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळक यांना खुनाची माहिती दिली. रामनगर ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविला.
 

श्‍वानपथकाची मदत


खुनातील आरोपीचा शोध घेण्यासाठी रामनगर पोलिसांनी गुरूवारी सकाळी श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते, पण आरोपीचा शोध लागला नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mundhwa Land Scam : मुंढवा सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात रवींद्र तारूला दिलासा नाही!

Nashik News : राज्यपाल थेट शेतात उतरले; खोरीपाड्यात ज्वारीची पेरणी करत नैसर्गिक शेतीचा संदेश!

Latest Marathi News Live Update: रिपब्लिकन पक्षाकडे मतांचा साठा असतानाही महायुतीकडून सत्तेचा वाटा मिळत नसल्याची नाराजी

Kannad News : खामगाव शिवारात बिबट्याचा थरार; खुल्या शेडमध्ये बांधलेल्या वासराचा फडशा!

HSRP Deadline Rule: आता दंड की सवलत? अंतिम मुदतीनंतरही HSRP नंबर प्लेट बदलली नसेल तर काय होणार? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT