Murder of a young man for trivial reasons Yavatmal crime news 
विदर्भ

सावधान! फोन करून त्रास देऊ नका; यवतमाळमध्ये याच कारणावरून झाला युवकाचा खून

सूरज पाटील

दिग्रस (जि. यवतमाळ) : फोनद्वारे त्रास देत असल्याच्या क्षुल्लक कारणातून वाद करीत तरुणाच्या डोक्‍यावर सेंट्रिंगच्या लाकूडद्वारे हल्ला करून खून केला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने आरंभी येथे एकच खळबळ उडाली आहे.

रामेश्‍वर प्रेमसिंग पवार (वय २८, रा. आरंभी) असे मृताचे नाव आहे. तरुण गजानन राठोड याला मोबाइलवर फोन करून त्रास देत होता. या कारणातून रस्त्यावर रामेश्वर व गजानन राठोड यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली. सेंट्रिंग लाकडाचा घाव डोक्‍यावर बसल्याने तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी दिग्रस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रात्री साडेनऊ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याप्रकरणी भारत पवार याने दिग्रस पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गजानन राठोड, दीपक राठोड (वय ४२), माणिक राठोड (वय ३८) सर्व रा. आरंभी यांच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाविरुद्घ गुन्हा नोंदविला आहे.

दिग्रस पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृताच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा आप्तपरिवार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले यांच्या मार्गदर्शनात रवींद्र जगताप, नरेंद्र पुंड, ब्रह्मदेव टाले करीत आहे.

आगीत सोन्याचे दुकान जळून खाक

दारव्हा शहरातील तेलीपुरा भागात असलेल्या श्री लक्ष्मी ज्वेलर्सला शॉटसर्किटमुळे आग लागली. या आगीत दुकान जळून खाक झाले. यामध्ये पाच लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. शहराच्या मध्यवस्तीतील तेलीपुरा भागात सतीश गुल्हाने यांच्या मालकीचे श्रीलक्ष्मी ज्वेलर्स आहे. पहाटे चार वाजताच्या सुमारास शॉटसर्किटमुळे दुकानाला आग लागली. अग्निशमन वाहनाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण आगीत दुकान जळून खाक झाले. दुकानातील फर्निचर, अडीच किलो चांदी, एक ग्रॅम सोन्याचे बेंटेक्‍स दागिने अशा एकूण पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT