Murder of a youth in Lumbini Nagar Amravati amravati crime news 
विदर्भ

युवकाने दोन अल्पवयीनांशी घेतला पंगा; धमकी दिल्यानंतर प्लान करून केला घात

संतोष ताकपिरे

अमरावती : काही दिवसांपासून क्षुल्लक कारणावरून सुरू असलेल्या वादातून युवकाची हत्या करण्यात आली. शुक्रवारी (ता. २५) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास लुंबीनीनगरात कुंभारवाड्याजवळ ही घटना घडली. रितेश उर्फ बंटी संतोष बारसे (वय २४, रा. पंचशीलनगर) असे मृत युवकाचे नाव असल्याचे पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेशचा काही दिवसांपूर्वीपासून पंचशीलनगर येथील दोन अल्पवयीनांसोबत वाद सुरू होता. रितेशने त्या दोघांना धमकी सुद्धा दिली होती. त्यातून अल्पवयीनांनी बदला घेण्याचे ठरविले. शुक्रवारी दुपारी रितेश हा परिसरातील एका दुकानाजवळ मोबाईलवर बोलत होता. त्याला एकट्याला बघून दोन्ही अल्पवयीनांनी त्याच्याजवळ जाऊन त्याच्यावर चाकूने सपासप वार केले.

हल्ल्यात रितेश गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर अल्पवयीनांनी तेथून पळ काढला. जखमीला त्याच्या भावासह नागरिकांनी उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रितेश उर्फ बंटीचा मृत्यू झाला. जखमीस इर्वीनमध्ये दाखल केल्यानंतर परिसरातील नागरिकांसह निकटवर्तीयांनी येथे गर्दी केली.

शहर कोतवाली पोलिसांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाचारण करण्यात आले. संशयित अल्पवयीनांना काही मिनिटात पोलिसांनी परिसरातूनच ताब्यात घेतले. मृत युवकाच्या भावाच्या तक्रारीवरून अल्पवयीनांविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या घटनेच्या कारणाचा शोध सुरू केला आहे.

एकाचवेळी दोघांनी केले चाकूने वार
एकाचवेळी दोघांनी चाकूने वार केला. रितेश उर्फ बंटी याच्या शरीरावर दहा पेक्षा अधिक घाव दिसले. याप्रकरणात प्रत्यक्षदर्शींचे बयाण नोंदविले जाईल.
- पुंडलिक मेश्राम,
पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT