विदर्भ

अमरावतीच्या गरीब दाम्पत्याला भंडाऱ्यात आधार; मुस्लिम बांधवांचा पुढाकार

दीपक फुलबांधे

भंडारा : रोजगारासाठी आलेले राऊत दाम्पत्य चिमुकलीसह लॉकडाउनमुळे गोंदियात अडकून पडले. शेवटी पायी गावाकडे जाण्यास निघाले व भंडारा येथे पोहोचले. येथे शहरातील मुस्लिम बांधवांनी त्यांना निःस्वार्थ मनाने मदत करून गावाकडे जाण्यासाठी रोख रक्कम दिली. यातून कोरोना संकटातील मानवीय मदत या कुटुंबासाठी लाख मोलाची ठरली आहे. (Muslim brothers help poor couple in Amravati)

असदपूर (जि. अमरावती) येथील राऊत दाम्पत्य लॉकडाउनच्या काळात रोजंदारीच्या कामासाठी गोंदिया येथे आले होते. पण, ज्या ठेकेदाराने कामासाठी गोंदिया येथे बोलविले होते, तोच ठेकेदार साथीदारांसह बिहार राज्यातील मूळ गावी निघून गेला. त्यांनी राऊत दाम्पत्याला कोणतीच मदत केली नाही. त्यामुळे हे दाम्पत्य गोंदियात अडकले होते. या कुटुंबात पती-पत्नी, १० वर्षांची चिमुकली सोबत होती. जवळ एक छदामही नसल्याने असदपूरला जायचे कसे? या विवंचनेत हे कुटुंब होते.

ते दोन जूनला गोंदियावरून असदपूरला जाण्यासाठी पायी निघाले. रस्त्यात एका पोलिस शिपायाने त्यांना भंडारा येथे जात असलेल्या खासगी ट्रकमध्ये बसवून रवाना केले. त्या रात्री त्यांनी भंडारा शहरातील राजीव गांधी चौकात उपाशीपोटी रात्र घालविली. तीन जूनला सकाळी त्यांची स्थिती पाहून काही व्यक्तींनी त्यांना जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे जाऊन मदत घ्या, असा सल्ला दिला. मदतीच्या अपेक्षेने तिघेही जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १० वाजता पोहोचले.

जिल्हाधिकाऱ्यांनी राऊत कुटुंबीयांना असदपूर येथे जाण्याइतपत मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, सायंकाळ झाली तरी उपाशीपोटी असलेल्या या तिघांना कोणताही कर्मचारी आणि नागरिकांनी मदत केली नाही. त्यामुळे निराश झालेले राऊत पती-पत्नी मुलीसोबत पोष्ट ऑफिस चौकात बाबा मस्तानशाह मशीदजवळ आले. तेथे असरार रफिक शेख हे नमाज अदा करून घरी जात असताना त्यांना हे राऊत कुटुंब दिसले.

त्यांनी आपले सहकारी नईमभाई, शरीफभाई, शाहरूख खान यांच्या मदतीने त्यांना जेवण-फळे दिली. या मित्रांनी त्वरित दोन हजार रुपयांची वर्गणी गोळा केली. त्यानंतर त्यांच्यासोबत ते बसस्थानकावर आले. परंतु, रात्र झाल्याने कोणतीही बस उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्यांच्या जेवणासह राहण्यासाठी सोय बाबा मस्तानशाह मदरसा येथे केली.

अन् राऊत कुटुंबीयांचे मन हेलावले

या घटनेची माहिती शहरातील दिव्यांग प्रहार सेवक एजाज अली यांना मिळाली. त्यांनी प्रहारे पक्षाचे प्रमुख आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या क्षेत्रातील असदपूर गाव असल्याने या घटनेची माहिती बच्चू कडू यांचे मोठे बंधू भय्याभाऊ कडू यांना दिली. त्यांनीसुद्धा राऊत दाम्पत्याला सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर शुक्रवारी राऊत कुटुंबीय बसद्वारे त्यांच्या गावाकडे रवाना केले. जातीधर्माचा विचार न करता केवळ मानवीय दृष्टीने मदत करणाऱ्या मुस्लिम बांधवांबाबत राऊत कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर कृतज्ञता दिसत होती.

(Muslim brothers help poor couple in Amravati)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT