विदर्भ

भाजपमुळे मुस्लिम आरक्षणापासून वंचित

सकाळवृत्तसेवा

नागपूर  - राज्यात मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण लागू करण्याला उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मुसलमान समाजाला शैक्षणिक आरक्षण लागू केले नाही, असा आरोप भाजपचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी केला आहे. भाजपच्या आमदाराने हा आरोप केल्यामुळे भाजप अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. 

आमदार आशीष देशमुख यांनी आयोजित केलेल्या ‘काटोल फेस्टिवल’मध्ये ‘मजलिस-ए-मुस्लमिन’ हा कार्यक्रम झाला. यात मुस्लिम समाजातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक बाबींवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात बोलताना देशमुख यांनी भाजपच्या नेतृत्वावरच टीका केली. या वेळी त्यांनी आघाडी सरकारने मुस्लिमांना आरक्षण दिले होते, असा दाखलाही दिला. भाजप-शिवसेना सरकारने मुस्लिम आरक्षणाचा कायदा न केल्याने मुस्लिम समाज शैक्षणिक आरक्षणापासून वंचित राहिल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला नोकरी व शैक्षणिक आरक्षण दिले होते. त्यापैकी उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाचे नोकरीतील आरक्षण रद्दबातल ठरविले, परंतु शैक्षणिक आरक्षण मुस्लिम समाजाला लागू करण्याला संमती दिली आहे. आघाडी सरकारच्या या निर्णयाची देशमुख यांनी भलामण केली आहे. 

यापूर्वी आमदार आशीष देशमुख यांनी भाजपवर वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून वार केला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT