The mystery of the murder in Amravati was revealed 
विदर्भ

एकताई गावात पाच दिवसांपूर्वी विहिरीत तरंंगताना आढळला होता मृतदेह, आज आले सत्य समोर

संतोष ताकपिरे

अमरावती : घरात घुसून ओळखीतील व्यक्तीने पत्नीसोबत असभ्य वर्तन केल्यामुळे चिडलेल्या पतीने आपल्या मेहुण्याला सोबत घेऊन एकाचा खून केला. पाच दिवसानंतर विहिरीत सापडलेल्या मृतदेहाचे रहस्य अखेर उलगडले.

दिलीप रामराव वरठी (वय ३०, रा. रंभा, भैसदेही, मध्यप्रदेश) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी (ता. २३) रात्रीच्या सुमारास चिखलदरा तालुक्यातील एकताई गावात ही घटना घडली होती.

याप्रकरणी संतुलाल भुता बेठेकर (वय २९) व मेहुणा संजुलाल राजमा तोटे (वय २६, रा. कुणखेडी, भैसदेही) या दोघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध खून व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. असे पोलिस निरीक्षक आकाश शिंदे यांनी सांगितले.

एकताई येथील बबलू बेठेकर यांच्या विहिरीत दिलीप वरठी यांचा मृतदेह २३ ऑगस्ट रोजी आढळला होता. प्रारंभी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. चिखलदरा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. घटनेच्या एका दिवसापूर्वी २२ ऑगस्ट रोजी रात्रीचे वेळी दिलीप वरठी याने संतुलालच्या घरात घुसून पत्नीशी अश्लील वर्तन केले होते.

त्यामुळे चिडून संतुलालने मेहुणा संजूलालच्या मदतीने वरठी यास गाठले. काठीने प्रहार करून दिलीपचा खून केल्यावर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला. अशी कबुली संतुलाल व संजुलाल या दोघांनी दिली. न्यायालयाने दोघांनाही सोमवारपर्यंत (ता. ३१) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

शवविच्छेदन अहवाल प्राप्त
शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात दिलीप वरठी याला आधी काठीने मारहाण करून खून केल्यानंतर मृतदेह विहिरीत फेकल्याची बाब नमुद आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला.
- आकाश शिंदे,
पोलिस निरीक्षक, चिखलदरा.

संपादन - नीलेश डाखोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT