suicide.jpg 
विदर्भ

नागपूरच्या राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सरची अकोल्यात आत्महत्या

भगवान वानखेडे

अकोला : पोलिस ठाण्यांतर्गंत येणाऱ्या शास्त्रीय स्टेडियम जवळील क्रीडा प्रबोधनीमध्ये नागपूर येथील राष्ट्रीय पातळीवरील सूवर्णपदक विजेता बॉक्सरने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.21) सकाळी सहा वाजता उघडकीस आली आहे. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शास्त्रीय स्टेडियम जवळील क्रीडा प्रबोधनीमध्ये नागपूर येथील बॉक्सर प्रणव राऊत (वय 22) या युवा बॉक्सरने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.21) सकाळी सव्वानऊ वाजता उघडकीस आली.

या घटनेची माहिती मिळताच क्रीडा विभागातील प्रमुख अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला आहे. याप्रकरणाचा खुलासा वैद्यकीय अहवालानंतरच होणार असून, पोलिस चौकशी करीत आहेत. 

क्रीडा वर्तुळातही आश्चर्य
प्रणव राऊत हा राष्ट्रीय पातळीवरील सूवर्णपदक विजेता खेळाडू आहे. त्याच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर क्रीडा वर्तुळातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत त्याचे वडिलांना माहिती देण्यात आली असून, ते नागपूर येथून अकोल्यातकरिता रवाना झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : महिलांच्या शोषणासाठी अशोक खरातला आयोगाच्या अध्यक्षांचेच अभय ? रुपाली पाटील ठोंबरे यांच्या दाव्याने खळबळ

'मी दारु पिणं सोडलं, कारण...', भारतीय स्टार क्रिकेटरने IPL 2026 पूर्वी घेतला मोठा निर्णय; सर्वकाही स्पष्टच सांगितलं

Latest Marathi News Live Update : बारामतीत युगेंद्र पवारांनी साजरा केला गुढीपाडवा; “मिस यू अजित काका” म्हणत केली भावनिक पोस्ट

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरांनी दिली गुडन्यूज, गुढीपाडव्याच्या दिवशी पोस्ट शेअर करत म्हणाले...

T20 World Cup विजयानंतर अजित आगरकरची BCCI कडे मोठी मागणी! त्याच्या कार्यकाळात जिंकल्या ३ ICC स्पर्धा, आता म्हणतोय...

SCROLL FOR NEXT