corona test positive in buldhana.jpg
corona test positive in buldhana.jpg 
विदर्भ

....या जिल्ह्यातील तीन पॉझिटिव्ह रुग्णांचे ‘नागपूर कनेक्शन’

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून बुलडाण्यात धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या 11 जणांपैकी तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बुलडाणा येथे 20 मार्च पासून धार्मिक कार्यासाठी या सर्व व्यक्ती आले होते.

दरम्यान, या अकरा जणांचे 25 एप्रिल रोजी अकोला येथील प्रयोगशाळेत स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी तिघांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी यास दुजोरा दिला आहे.

परिणामी, बुलडाणा जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 24 झाली आहे. दरम्यान यापैकी पंधरा जणांना आतापर्यंत बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलीआहे, तर आठ जणांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये आता शेगाव, खामगाव, देऊळगाव राजा आणि सिंदखेडराजा हे तालुके कोरोना मुक्त झालेले आहेत.

आवश्‍यक वाचा - हेच का ते अच्छे दिन?...

सिंदखेड राजा येथील एकास आज सोमवारी दुपारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. प्रेमचंद पंडित उपस्थित होते. त्याच दरम्यान बुलडाणा शहरात कामठी येथील 11 जणांपैकी तीनजण कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याचे वृत्त धडकले. बुलडाणा जिल्ह्यात तब्बल तेरा दिवसानंतर कोरोना पॉझिटिव्ह तीन रुग्ण आढळून आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Vilasrao Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावूक; शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT