Crime News 
विदर्भ

Crime News : चोरीच्या पैशातून काढले टॅटू, आयफोन खरेदी; दोन आरोपींसह विधिसंघर्ष बालकाला अटक

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : चोरी करून त्या पैशांत ऐश करीत मुंबईसह बाहेरगावी फिरून येणाऱ्या दोन आरोपींसह दोन विधिसंघर्ष बालकांना पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे.

अमर उर्फ प्रिन्स विनोद डोंगरे (वय १९, रा. आंबेडकर कॉलनी, जरिपटका) आणि रूद्रेश उर्फ रूद्र युवराज साखरे (वय- १९, रा. नमो बौद्ध विहार, इंदोरा) अशी आरोपींची नावे आहेत. ९ जून रोजी बुद्धनगरातील चंद्रमनी बुद्ध विहार जवळ लांजेवार यांच्या घरी भाड्याने राहणारे सुनील ताकसांडे (वय ५०) हे बाहेरगावी गेले.

चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने व लॅपटॉप, एलसीडी आणि रोख असा एकूण २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत पाचपावली पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. अमर आणि त्याच्या साथीदारांनी घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

चोरलेल्या पैशातून त्यांनी टॅटू, आयफोन खरेदी करीत, मुंबई आणि नाशिक फिरल्याचीही बाब समोर आली. दरम्यान पैसे संपल्याने ते नागपुरात येताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. विचारणा केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत, चोरलेले इतर साहित्य लपवून ठेवल्याचे सांगितले.

यावेळी इतरही चोरीची कबुली आरोपींनी दिली. त्यांच्यावरील पाचपावलीत ३ तर रामटेक, नागपूर ग्रामीण येथील वाहन चोरीचे २ गुन्हे असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी त्यांच्याकडील एकूण ५ लाख ६५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई परिमंडळ तीन चे पोलिस उपायुक्त गोरख भांमरे, सहायक पोलिस आयुक्त सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव जाधव, पोलिस निरीक्षक (गुन्हे) महेन्द्र अंभोरे, पोलिस उपनिरीक्षक जितेन्द्र भार्गव, पोलिस हवालदार ज्ञानेश्‍वर भोगे, इमरान शेख, रोमेश मेनेवार, गगण यादव, संतोष शेंन्द्रे, राहुल चिकटे, महेन्द्र सेलोकर, नितीन लोखंडे, दीपक, अश्विनी यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT