विदर्भ

धम्मदीक्षेचा वर्धापनदिन शनिवारी

सकाळवृत्तसेवा

नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्‍टोबर १९५६ साली नागवंशीयांच्या भूमीत कोट्यवधी अस्पृश्‍यांना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा धम्म दिला. त्या धम्मक्रांतीचा ६१ वा वर्धापनदिन सोहळा शनिवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी ६ वाजता दीक्षाभूमीवर साजरा होणार आहे.

प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व महापौर नंदा जिचकार राहतील. हा सोहळा भन्ते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली होईल, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे कार्यवाह सदानंद फुलझेले यांनी सोमवारी दिली.

अशोक विजयादशमीच्या पर्वावर दीक्षाभूमीवर भीमसागराला उधाण येते. ६१ वर्षांपूर्वीच्या आठवणींना धम्मक्रांतीच्या सोहळ्याला उजाळा मिळतो. २७ ते ३० सप्टेंबरला असे चार दिवस येथे वैचारिक जल्लोष असतो.

 बुधवारी सायंकाळी ६ वाजता महिला परिषद होईल. गुरुवारी सकाळी ९ वाजतापासून भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा देण्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ होईल. सायंकाळी ६ वाजता भीमा तुझ्या जन्मामुळे दीर्घांक सादर करण्यात येईल. शुक्रवारी सकाळी ९ वाजता एन. आर. सुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. अध्यक्षस्थान विलास गजघाटे असतील.

३० सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता मुख्य सोहळा होईल. मुख्य सोहळ्यानंतर रात्री ९ वाजता आई साहेब रमाई आंबेडकर हा दीर्घांक सादर होईल. विशेष असे की, यावर्षी दहा ते बारा लाख अनुयायी उपस्थित राहतील असा दावा फुलझेले यांनी केला आहे. पत्रकार परिषदेला स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, प्रा. पी. सी. पवार, एन. आर. सुटे, देवा रंगारी व मधुकर मेश्राम होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT