विदर्भ

‘सीएमआरएस’ पथकाचा ‘मेट्रो’तून प्रवास 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - मेट्रो रेल्वेतून प्रवासी वाहतुकीच्या दिशेने महामेट्रोने आगेकूच केली असून, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत खात्री करून घेण्यासाठी आज सीएमआरएसच्या (मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त) पथकाने एअरपोर्ट (साउथ) ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रो रेल्वेने प्रवास केला. दिवसभर विविध तपासण्यांनंतर या पथकाने सायंकाळी मेट्रोहाउसमध्ये अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. 

मेट्रो रेल्वे प्रवाशांसाठी सुरू करण्यापूर्वी सीएमआरएसची परवानगी आवश्‍यक आहे. आज मुंबई केंद्रीय मंडळाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त अरविंदकुमार जैन यांच्या नेतृत्वातील जी. पी. गर्ग, उत्तम प्रकाश यांनी मेट्रो रेल्वेच्या विविध सुविधांची पाहणी केली. ‘सीएमआरएस’ पथकाने सर्वप्रथम एअरपोर्ट (साउथ) मेट्रो स्टेशनला भेट दिली. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी पथकातील अधिकाऱ्यांना नागपूर मेट्रो प्रकल्पाबद्दल माहिती दिली. या पथकाने एअरपोर्ट(साउथ) ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोने प्रवास करीत चाचणी घेतली. प्रवासादरम्यान मेट्रो कोचेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित ब्रेक सिस्टिम व इतर सर्व उपकरणांची तपासणी केली. मेट्रो कोचेसमध्ये असलेल्या सुरक्षा उपकरणांचीदेखील चौकशी त्यांनी केली. यानंतर मिहान डेपोमध्ये झालेल्या बैठकीत प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. प्रकल्पाची प्रगती  आणि इतर संबंधित तपशिलांची माहिती यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आली. ‘सीएमआरएस’ने मिहानमध्ये मेट्रोचा मुख्य मार्ग व डेपोला वीजपुरवठा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्‍शन सब-स्टेशन, बचावाची उपकरणे आणि हायड्रोलिक जॅकचे निरीक्षण केले. सायंकाळी सीएमआरएसच्या अधिकाऱ्यांनी सिव्हिल लाइन्स येथील मेट्रो हाउसमध्ये अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्रकल्पातील बारकाव्यांबाबत माहिती घेतली. यावेळी महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक ॲण्ड सिस्टिम) सुनील माथूर, संचालक (वित्त) एस. शिवमाथन आणि महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे प्रामुख्याने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT