विदर्भ

ओबीसी युवक-युवतींचे उद्या महाअधिवेशन 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला. परंतु, अद्याप या विभागात ओबीसी समाजाच्या, विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले नाही. यामुळेच ओबीसी समाजीतील विद्यार्थ्यांचा लढा उभारण्यासाठी त्यांच्या प्रश्‍नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे बुधवारी (ता.२०) युवा-युवतींचे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

काँग्रेसनगर येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख  सभागृहात हे अधिवेशन होणार असून, सकाळी १० वाजता जलसंधारण तसेच ओबीसी विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. अध्यक्षस्थानी डॉ. खुशालचंद्र बोपचे असतील. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार नाना पटोले, आमदार एकनाथ खडसे, प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, ॲड. गणेश हलकारे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार बळीराम सिरसकर, आमदार सुनील केदार, आमदार रवी राणा, आमदार डॉ. परिणय फुके, माजी आमदार डॉ. अविनाश वारजुरकर, प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे प्रमुख पाहुणे असतील. या नवीन विभागाकडे सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीतील अनेक विषय हस्तांतरित केले आहेत. परंतु, त्या संबंधीची अधिसूचनाही काढली आहे. परंतु, अद्याप इतर मागासवर्ग प्रर्वगाच्या कल्याणासाठी सरकारी यंत्रणा कार्यान्वित झाली नाही. या अधिवेशनात ओबीसींच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे युवाप्रमुख मनोज चव्हाण यांनी सांगितले.

ओबीसी समाजाच्या मागण्या
- ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करावी
- ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे
- क्रिमिलेअरची अट रद्द करावी
- १०० टक्के ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी
- जिल्हा व तालुका स्तरावर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तयार करावे
- राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा द्यावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT