नागपूर - मोर्चात सहभागी अंगणवाडी सेविका.
नागपूर - मोर्चात सहभागी अंगणवाडी सेविका. 
विदर्भ

हजारो अंगणवाडी सेविकांची धडक

सकाळवृत्तसेवा

नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच्या दिवशी हजारो अंगणवाडी सेविकांनी  विविध मागण्यांसह विधानभवनावर धडक दिली. मोर्चाच्या मागण्यांचे निवेदन राज्यमंत्री विद्या ठाकूर (महिला बालविकास) यांनी स्वीकारून मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात लवकरच बैठक  घेण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दिले.

अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) संघटनेच्या वतीने अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी सोमवारी (ता. ११) सकाळी ११.३० वाजता मोर्चा धडकला. पोलिसांनी टेकडी रोडवर मोर्चाला रोखले. मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे राज्याध्यक्ष ॲड. निशा शिऊरकर, महासचिव कमल परूळेकर, जयश्री काळे, कार्याध्यक्ष चंद्रशेखर शुक्‍ला, रूपचंद गदरे, कृष्णा भानारकर, सरिता मांडवकर, निर्मला निखाडे यांनी केले.

अंगणवाडी सेविकांनी कर्मचाऱ्यांची आंदोलन काळातील (संप) २६ दिवसांचे वेतन कपात शासनाने लगेच केली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी एक हजार रुपयांच्या वेतनवाढीचे आश्‍वासन अद्याप  पूर्ण केले नाही. प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिल्या जाते. तसेच त्यांच्याकडून अतिरक्‍ति काम करून घेतल्या जाते. त्यावर नियंत्रण ठेवावे. २०१५ पासून कर्मचाऱ्यांना स्टेशनरी रजिस्टरे दिली नाहीत. त्यामुळे आर्थिक बोजा पडला आहे. अशा कामांसाठी आर्थिक तरतूद करावी आदी मागण्यांसाठी आंदोलन केले.

प्रमुख मागण्या
 अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करा.
 भाऊबिजेसाठी एक हजार रुपये देण्याचे आश्‍वासन पूर्ण करा.
 सेविकांना आजारपणाच्या सुट्या व सुरळीत मानधनावर शासनाने          विचार करावा.
 आजारपणाची १५ दिवसांची रजा मंजूर करावी.
 उन्हाळ्यात सलग महिनाभराची सुटी मंजूर करावी.
 आशा कर्मचाऱ्यांना अंगणवाडी सेविका मदतनिसांप्रमाणे मानधन         लागू करावे.
 अंगणवाडी सेविकांना आहार शिजविण्याची सक्‍ती करू नये.
 अंगणवाडी कर्मचारी, मुख्यसेविका आदी पदे भरा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT