Railway 
विदर्भ

पुण्याला निघाली नागपूरची महिला, अन्‌ मनमाडनंतर तुटला संपर्क 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पुण्याला रवाना झालेली महिला रेल्वे प्रवासादरम्यान बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. युवती, महिलांशी संबंधित दुर्दैवी घटना सातत्याने पुढे येत असल्याने कुटुंबीय चांगलेच धास्तावले आहेत. त्यांनी सोमवारी लोहमार्ग ठाणे गाठून तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रकरणाची नोंद करीत पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला आहे. बेपत्ता असलेली 45 वर्षीय महिला मानेवाडा परिसरातील रहिवासी आहे. 

पुण्यातील शिवाजीनगरात राहणाऱ्या एका कुटुंबाला मुलगी सांभाळण्यासाठी महिलेची गरज आहे. यासाठी त्यांनी वृत्तपत्रांमधून जाहिरात दिली होती. त्यावरील क्रमांकावर महिलेने संपर्क साधून कामाची तयारी दर्शविली आणि सोमवारी सकाळी अजनीहून पुण्याला जाणाऱ्या गाडीतून रवाना झाली. प्रवासादरम्यान पतीचे फोनवरून तिच्यासोबत बोलणेही झाले. मनमाडपर्यंत ती संपर्कात होती. त्यानंतर मात्र संपर्कच तुटला. तिकडे पुण्याची महिला गाडीच्या वेळी तिला घेण्यासाठी पुणे स्थानकावर पोहोचली. पण, नागपूरकर महिलेसोबत तिचा संपर्कच झाला नाही. यामुळे पुणेकर महिलेने नागपूरकर महिलेच्या पतीला फोन करून माहिती दिली.

अवश्य वाचा - डॉन संतोष आंबेकरचा आणखी एक कारनामा

कुटुंबीय चांगलेच घाबरले 
महिलेचा कुठलाच ठावठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीय चांगलेच घाबरले. त्यांनी पुण्याकडे राहणाऱ्या आपल्या नातेवाइकांसोबत संपर्क साधून प्रकरणाची माहिती दिली. त्यांनीही सर्वत्र शोध घेतला. पण, महिलेबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. कुटुंबीयांनी लोहमार्ग ठाणे गाठून माहिती दिली. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनीसुद्धा महिलेचा शोध सुरू केला आहे. 

एकाकी युवतीला मदतीचा हात 
कळंबा रेल्वेस्थानकावर एक 25 वयोगटातील युवती एकटीच फिरत होती. संभाव्य धोके लक्षात घेत पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन नागपुरात आणले. बरेच प्रयत्न करूनही ती कोणतीच माहिती देत नसल्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला शासकीय वसतिगृहात पाठविण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐन दिवाळीत ठाणे ATSची मोठी कारवाई! कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला डोंबिवलीजवळ केली अटक

Sangli Sugarcane Price : 'ऊसदर जाहीर करा, अन्यथा धुराडी बंद पाडू'; राजू शेट्टींचा सांगलीतील साखर कारखानदारांना 2 दिवसांचा अल्टिमेटम, केल्या 5 मोठ्या मागण्या

IND vs NZ 2nd ODI Live : आकिब नबीने विश्वास सार्थ ठरवला... किवींना ११ धावांत २ धक्के; KL Rahul चा अविश्वसनीय झेल Video Viral

Latest Marathi News Live Update : शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज; सकाळी १० वाजता ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार

Bala Nandgaonkar: विकसकाच्या बाऊन्सर्सचा बंदोबस्त करा; बाळा नांदगावकर; पिंगुळी पाझर तलाव, सासोली जमीन घोटाळाप्रश्‍नी आक्रमक

SCROLL FOR NEXT