10th and 12th students may affected due to load shedding in rural areas  
नागपूर

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना घाम गाळत सोडवावा लागणार पेपर; ग्रामीण भागातील लोडशेडिंग नडणार?

मंगेश गोमासे

नागपूर ः उन्हाळ्याच्या दिवसात शाळांमध्ये दहावी आणि बारावीचे पेपर सोडवायचे आहे. मात्र, या दिवसात ग्रामीण भागातील बत्तीगुल होत असल्याने विद्यार्थ्यांनी पेपर कसा सोडवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. या विरोधात आता शिक्षक संघटना सरसावल्या असून विदर्भातील विद्यार्थ्यांचे पेपर सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत सोमवारी संघटना निवेदनही सादर करणार आहेत.

दरवर्षी बारावीची परीक्षा फेब्रुवारी ते मार्चदरम्यान होत असते. तसेच १ ते २५ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात येते. मात्र, कोरोनामुळे यावर्षी २३ एप्रिल ते २१ मेदरम्यान बारावी तर २९ एप्रिल ते २० मेदरम्यान दहावीचे पेपर घेण्यात येणार आहे. या महिन्यांमध्ये विदर्भात राज्याच्या तुलनेत उन्हाचा पारा ४८ पर्यंत जातो. त्यामुळे पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना चांगलाच घाम फुटणार आहे. 

विशेष म्हणजे शहरी भागात सुविधा असलेल्या शाळा असल्या तरी, ग्रामीण भागातील विजेची समस्या मोठी आहे. प्रत्येकच दिवशी तालुक्यात विजेची समस्या असते. त्यामुळे ज्या शाळांमध्ये विद्युत पुरवठा आहे, मात्र, विजेअभावी त्या शाळेमधील विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके बसणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत ४५ पेक्षा अधिक तापमानात विद्यार्थी कसा तीन तास काय पेपर देईल, याबाबत साशंकता आहे. 

विद्यार्थ्यांच्या तब्येती बिघडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे. उन्हामुळे विद्यार्थ्यांची तब्येत खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या परीक्षांवरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ग्रामीण भागात नेहमीच विजेची समस्या आहे. प्रत्येक तालुक्यात विज सतत जात असते. त्यामुळे परीक्षेच्या काळात विद्युत पुरवठा नियमित व्हावा अशी मागणी आहे. याशिवाय उन्हाळ्यात परीक्षा होत असल्याने सकाळी ९ ते १२ अशी वेळ ठेवण्याची मागणी करण्यात येणार आहे.
अनिल गोतमारे,
 जिल्हाध्यक्ष, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

B Sudarshan Reddy reaction : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर बी. सुदर्शन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Pune News : हवेची गुणवत्ता वाढल्याने पुण्याचा देशात १० वा क्रमांक

SCROLL FOR NEXT