नागपूर

तिसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस दाखल; नागपुरात पोहोचला ११ टँकर प्राणवायू

योगेश बरवड

नागपूर : देशातील पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस (Oxygen Express) नागपूरमार्गे चालविण्यात आली. हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर प्राणवायूच्या उपलबद्धेसाठी देशभरात ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्यात येत आहे. नागपुरात रविवारी पहाटे प्राणवायूचे आणखी चार टँकर रेल्वेने दाखल (Four tankers filed by train) झाले. नागपुरात पंधरवाड्यात तीन ऑक्सिजन एक्स्प्रेस पोहोचल्या असून, त्यातून ११ टँकर वैद्यकीय उपयोगाचा प्राणवायू पोहोचला आहे. त्यामुले कोरोनाग्रस्त व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (11 tankers of oxygen reached Nagpur)

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना रेल्वेची मदत घेण्यात आली. २२ एप्रिलला पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टणम येथून महाराष्ट्रच्या दिशेने रवाना झाली होता. २३ एप्रिलला रात्री ती नागपुरात दाखल झाली. सर्वाधिक अडचणीच्या त्या काळात तीन टँकर प्राणवायू उपलब्ध झाला होता.

शनिवारी (ता. ८) दुसरी ट्रेन नागपुरात पोहोचली. त्याद्वारे ऑक्सिजनचे चार टँकर पोहोचले. रविवारी पहाटे पोहोचलेल्या ट्रेनमधून आणखी चार टँकर ऑक्सिजन पोहोचले. शनिवार आणि रविवारी पोहोचलेले एकूण आठ टँकर ऑक्सिजन ओडिसाच्या अंगुल येथून आणण्यात आले आहे. फलाट क्रमांक ८ वर ही एक्स्प्रेस दाखल झाल्यानंतर पूर्वीच तयार करून ठेवलेल्या रॅम्पवरून टँकर खाली उतरवून घेण्यात आले. त्यातील ऑक्सिजन वितरणाचा निर्णय राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाला करायचा आहे.

सध्या कोरोनाबाधितांची संख्या घटत असल्याचे आशादायी चिन्ह असले तरी मृत्यूसंख्येवर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान वैद्यकीय यंत्रणेसमोर आहे. त्यासाठी ऑक्सिजनची मागणी अजूनही मोठ्या प्रणाणावर आहे. दुसऱ्या लाटेनेच वैद्यकीय व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली असतानाच पाठोपाठ त्यात तिसऱ्या लाटेचे संकटही घोंगावते आहे. अशात ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा महत्त्वाची बाब ठरणार आहे.

(11 tankers of oxygen reached Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT