नागपूर

दिलासादायक! नागपुरात पाच दिवसांत तब्बल ११ हजार रुग्णांची कोरोनावर मात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लॉकडाउनसह (Lockdown) आरोग्य यंत्रणेच्या विविध उपाययोजनांमुळे काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. गेल्या पाच दिवसात जिल्ह्यातील (Nagpur District) सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० हजार ८०० ने कमी झाली आहे. तर जिल्ह्यात बुधवारी (ता.५) ४ हजार ३९९ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. उच्चांकी आकड्यावर जाऊन बसलेल्या बाधितांसह मृत्यूदरही रोडावत असल्याने उपराजधानीच्या जीवात जीव येत आहे. (11 thousand patients defeat corona in just 5 days in Nagpur)

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात ठाण मांडून बसल्यानंतर मृत्यूचे तांडव घडविणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव महिन्यांनंतर का होईना घटत आहे. ३० एप्रिल रोजी जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ७६ हजार ९१६ होती. यातील शहरातील ४४ हजार ९१३ तर ग्रामीण भागातील ३१ हजार ७९३ सक्रिय कोरोनाबाधित उपचार घेत होते. मात्र १ ते ५ मे या कालावधीत जिल्ह्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या १० हजारावर घटली असून आता ६६ हजार ११६ आहे. या पाच दिवसांमध्ये शहरातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ८ हजार २६५ ने कमी झाली.

तर ग्रामीण भागातील २ हजार ३२५ सक्रिय कोरोनाबाधित कमी झाले. ही दिलासादायक बाब जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यात २१ हजार ६१२ कोरोना चाचण्या झाल्या असून यातील ४ हजार ३९ बाधित आढळले.यात शहरातील २ हजार ५३४ तर ग्रामीण भागातील बाधितांची संख्या १ हजार ८५३ होती. जिल्ह्याबाहेरून रेफर करण्यात आलेल्या बाधितांची संख्या १२ होती.विशेष असे की, रेफर करण्यात आलेले सर्व १२ जणांच्या मृत्यूसह शहरात ४८ तर ग्रामीण भागात २२ जणांचा मृत्यू झाला. अशा एकूण ८२ मृत्यूची नोंद झाली.जिल्ह्यातील ७ हजार ८२८ मृत्यूंमध्ये शहरातील ४ हजार ७३३ मृत्यू आहेत. तर १ हजार ९८० कोरोनाचे मृत्यू हे ग्रामीण भागातील आहेत. गेल्या २४ तासात ८२ जणांचा मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ७ हजार ८२८ वर पोहचला. तर बाधितांची एकूण संख्या ४ लाख ३२ हजार ९३८ झाली आहे.

कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढली

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या तुलनेत मागील सहा दिवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ५ मे रोजी ७ हजार ४०० जणांनी कोरोनावर मात केली. १ ते ५ मे या पाच दिवसांच्या कालावधीत बाधितांच्या तुलनेत ३५ हजार २३ जणांनी कोरोनावर मात केली. कोरोनाबाधितांपेक्षा मुक्त झालेल्यांचा आकडा अधिक येत असल्याची बाब सामान्यांना समाधान देणारी ठरत आहे.

(11 thousand patients defeat corona in just 5 days in Nagpur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: मागील १० वर्षांमध्ये मोठ्या बाता मारण्यात आल्या. परंतु, तुमच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही - प्रियांका गांधी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT