Corona Vaccination file photo
नागपूर

नागपुरात 13 लाखांवर तरुण लसीकरणाच्या प्रतिक्षेत, फक्त ११ हजार तरुणांना लस

राजेश प्रायकर

नागपूर : तरुणाईसाठी सुरू केलेल्या लसीकरणाचा (vaccination) आठवडाभरातच बोजवारा उडाल्याने शहरातील तेरा लाखांवर तरुण लसीपासून वंचित आहे. नजिकच्या काळात लसीच्या तुटवड्यावर (shortage of vaccine) उपाय निघण्याची शक्यता नसल्याने तरुणांच्या लसीकरणावर अनिश्चिततेचे सावट दिसून येत आहे. परिणामी शहरात विविध संस्थांच्या माध्यमातून कोरोना योद्धा म्हणून बाधितांची सेवा करीत असलेल्या तरुणाईला कोरोनाचा धोका कायम आहे. शहरात केवळ ११ हजार तरुणांनी लस घेतली. दरम्यान, काही केंद्र स्थानांतरित केल्याने ज्येष्ठांना लसीकरणासाठी हेलपाटा माराव्या लागत आहे. (13 lakh youth waiting for vaccination in nagpur)

शहराची लोकसंख्या ३० लाख असून यात १८ ते ४५ वयोगटातील तरुणांची संख्या ४५ टक्के आहेत. अर्थात या वयोगटातील १३ लाख तरुण आहेत. या तरुणाईसाठी एक मेपासून लसीकरणाची मोहिम सुरू केली. परंतु, ही मोहिम सुरू करतानाच लसीचा तुटवडा सुरू झाला होता. आठवड्याभरातच तरुणाईच्या लसीकरणाचा बोजवारा उडाला. मागील एप्रिल ते ३१ मार्च २०२१ पर्यंत शहरात कोरोनाने साडेपाचशे तरुणांचा मृत्यू झाला. यात मोठ्या प्रमाणात तरुण कोरोनाबाधितांसाठी काम करताना बाधित झालेले होते. याशिवाय सद्यःस्थितीतही बाधितांच्या कुटुंबीयांना जेवण पुरविणे, त्यांच्यासाठी ऑक्सिजन, बेड आदीची व्यवस्थेसाठी विविध सामाजिक संस्थांचे तरुण पदाधिकारीच कार्यरत आहे. बाधितांसाठी काम करणाऱ्या या तरुणाईला लसीचे कवच आवश्यक असतानाच ही मोहिम गुंडाळल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील १३ लाख तरुणांपुढे लस कधी मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यंत शहरात केवळ ११ हजार तरुणांनी पहिला डोस घेतला. लसीच्या तुटवड्यामुळे दोन डोसमधील कालावधी ८४ दिवसांचा करण्यात आला. परंतु, याबाबत जनजागृतीही नाही, याशिवाय महापालिकेने काही केंद्र बंद करून ते दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरीत केल्याचेही कळमना हिंदी प्राथमिक शाळेतील केंद्रावरून दिसून येत आहे. याचा मनस्ताप ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे.

ज्येष्ठांसाठी आजपासून 'लसीकरण आपल्या परिसरात'

महापालिकेने ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन मोहिम सुरू केली. आता पुन्हा ‘लसीकरण आपल्या परिसरात` ही मोहिम सोमवारपासून राबविण्यात येणार असल्याचे मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले. या मोहिमेत ४५ वर्षावरील नागरिकांना पहिला व दुसरा डोस दिल्या जाईल. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे त्यांनी नमुद केले. मात्र, तरुणाईला मात्र अनिश्चित काळासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आतापर्यंत झालेले लसीकरण

  • पहिला डोस घेणारे एकूण नागरिक - ४,८६,३८५

  • दुसरा डोस घेणारे एकूण नागरिक - १,५९,८७०

  • पहिला डोस घेणारे एकूण तरुण - ११,१४१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT