15 goons involve in eknath nimgade murder case says police commissioner amitesh kumar 
नागपूर

'एकनाथ निमगडे हत्याकांडात रणजित सफेलकरने घेतली होती ५ कोटींची सुपारी, हत्याकांडात कुख्यात १५ गुन्हेगार'

अनिल कांबळे

नागपूर : राज्यातील बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांडाचा उलगडा करण्यात नागपूर गुन्हे शाखेला यश आले. श्रीराम सेनेचा अध्यक्ष रणजित सफेलकर याने पाच कोटींची सुपारी घेऊन निमगडे हत्याकांड घडवून आणले. यात एकूण कुख्यात १५ आरोपींचा समावेश आहे. सध्या मुख्य आरोपी सफेलकर हा फरार आहे. त्याला कुणी सुपारी दिली होती, हे अद्याप उघड झाले नसले तरी त्याला अटक होताच ती माहिती होईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रपरिषदेत दिली. 

६ सप्टेंबर २०१६ मध्ये लाल ईमली मार्गावर दुचाकीने ट्रीपल सिट आलेल्या हल्लेखोरांनी एकनाथ निमगडे यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे होता. परंतु, दोन वर्षांपर्यंत आरोपी न सापडल्यामुळे हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. यादरम्यान पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गेल्या १० वर्षांतील 'अनडिटेक्ट मर्डर' फाईल्स उघडल्या होत्या. गुन्हे शाखेने निमगडे हत्याकांडातील आरोपींचा शोध घेणे सुरू केले. यामध्ये गुन्हे शाखेला छिंदवाडा जेलमधील राजा नावाच्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर सुगावा मिळाला होता. तो धागा धरून गुन्हे शाखेने निमगडे हत्याकांडाचा छडा लावला. सीबीआय लवकरच अटकेची प्रक्रिया करणार आहे. पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी आणि पोलिस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने उपस्थित होते. 

महिनाभर केली होती रेकी - 
एकनाथ निमगडे यांचा खून करण्यासाठी रणजित सफेलकरने एका 'शेठ'कडून ५ कोटींची सुपारी घेतली होती. त्याने शरद ऊर्फ कालू हाटे, नवाब ऊर्फ नब्बू छोटोसाब अशरफी, शाहबाज, राजा ऊर्फ पीओपी, बाबा, परवेज, फिरोज, मुश्‍ताक ऊर्फ मुशू छोटेसाब अशरफी आणि अफसर या कुख्यात गुंडाच्या टोळीची निवड केली. अ‌ॅडव्हान्स म्हणून २० लाख रुपये देण्यात आले. टोळीने महिनाभर रेकी केली. त्यानंतर एक कोटी रुपये टोळीला देण्यात आले. 

१०० कोटींच्या भूखंडामुळे हत्याकांड -
आर्किटेक्ट एकनाथ निमगडे वर्धा मार्गावर विमानतळाजवळ जवळपास १०० कोटींपेक्षा जास्त किमतीची साडेपाच एकर जागा आहे. या जागेवरून हिंदुस्थान ट्रॅव्हल्सचे मालक अन्नू सिद्दीकी, आतीक सिद्दीकी, पायोनिअर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे संचालक अनिल नायर आणि ग्रीन लॅब्रेज नावाच्या कंपनीचे मालक गुप्ता नावाच्या व्यक्तीशी त्यांचा वाद सुरू होता. त्यासंदर्भात दिवाणी न्यायालयात खटलाही सुरू होता. त्यामुळे याच जमिनीच्या वादातून रणजित सफेलकर याला सुपारी देण्यात आली असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मात्र, रणजित सफेलकरच्या अटकेनंतर कारण स्पष्ट होईल, असेही अमितेश कुमार यांनी सांगितले. 

तिघांनीही केली फायरिंग -
नब्बू व त्याचे साथीदार प्रत्येक चौकात दोन महिन्यांपासून एकनाथ निमगडे यांच्यावर नजर ठेवून होते. नब्बूने निमगडे यांचे फोटो प्रत्येकाला दाखवले होते. ६ सप्टेंबर २०१६ च्या सकाळी निमगडे नेहमीप्रमाणे गांधीबाग उद्यानातून फिरून घरी परत येत असताना डागा रुग्णालयाच्या पाठीमागील लाल इमली गल्लीत राजा, परवेज व बाबा यांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. यात निमगडे यांना पाच गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. 

गुन्हे शाखेला पाच लाखांचे बक्षीस -

निमगडे हत्याकांडाचा पाठपुरावा करण्यासाठी सीबीआयचे पथक बुधवारी नागपुरात आले. या प्रकरणात सबळ पुरावे गोळा करण्यात गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गजानन राजमाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचंड परिश्रम घेतले. पुराव्यामुळेच आरोपी स्पष्ट झाले. सीबीआयने डीसीपी राजमाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT