नागपूर : पदवीचे शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थिनीवर दोन युवकांनी बलात्त्कार केला. एकीवर फेसबूकने फ्रेंडने तर दुसरीवर शादी डॉट कॉमवर ओळख झालेल्या तरूणाने लैगिक शोषण केले. या प्रकरणी पोलिसांनी दोनही आरोपींवर गुन्हे दाखल केले.
पहिल्या घटनेत, पीडित २१ वर्षीय तरूणी ही इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. ती बेसा रोडवर राहते. तिचे वडील खासगी नोकरी करतात. तिला आरोपी विक्रम बोंद्रे (२१, सिल्ली, ता. तिरोडा, जि.गोंदिया) याच्याशी फेसबूकवर ओळख झाली. दोघांची चॅटिंग सुरू झाली. १५ दिवसांतच दोघांचे एकमेकांवर प्रेम झाले. विक्रमने तिला नागपुरात भेटण्यासाठा येत असल्याचे सांगितले. ३० मार्चला आरोपी विक्रम हा मामेभाऊ अतुल याच्यासोबत दुचाकीने नागपुरात आला. त्याने तिला पाहताच क्षणी पसंत असल्याचे सांगून लग्नाची बोलणी करण्यासाठी घरी येण्यासाठी सोबत चलण्यास सांगितले.
तिनेही लगेच विक्रमच्या दुचाकीवर बसून गोंदिया गाठले. दोघांनीही तिला आई आणि बहिणीची भेट घालून देणार असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी तिला घरी न नेता थेट लॉजवर नेले. तेथे विक्रमने तीन दिवसांसाठी रूम बूक केली. तिच्यावर सलग तीन दिवस बलात्कार केला. दुसरीकडे मुलगी अचानग बेपत्ता झाल्याने आई-वडीलांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात मिसींगची तक्रार दाखल केली. तीन दिवसांनंतर विक्रमने तरूणीला घरासमोर आणून सोडले आणि पळ काढला. यानंतर फोन न करण्याची तंबी दिली. आईने विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी हडकेश्वर पोलिसांनी विक्रम बोंद्रेवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
शादी डॉट कामने केला घोळ
जरीपटक्यातील मेकोसाबागमध्ये राहणारी २० वर्षीय तरूणी रिया हा आयडीआयचे शिक्षण घेत आहे. तिने गम्मत म्हणून शदी डॉट कॉमवर प्रोफाईल तयार केले. तिने फक्त टाईमपास म्हणून अनेक तरूणांचे प्रोफाईल ती बघत होती. दरम्यान तिला प्रथमेश सुरेंद्र सोहळे (२३, तिवसा, अमरावती) याने तिला कॉल केला आणि तिला लग्नाची मागणी घातली. परंतु रियाला टाईमपास करायचा असल्यामुळे तीने प्रथमेशला सुरवातीला मैत्री करण्याची ऑफर केली.
मैत्री मॅच झाली तर लग्नाचे बघू अशी अट ठेवली. १८ जानेवारीला प्रथमेश हा नगापुरात आला. त्याने सदरमधील हॉटेल बुक केले. तिला भेटायला बोलावले आणि थेट शारीरिक संबंध प्रस्थापित केले. व्हॅलेंटाईन डेला तिला पुन्हा हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केला. त्यानंतर तिला गुडबाय म्हणत फोन ब्लॉक केला. तिने सदरमध्ये बलात्काराची तक्रार दिली. .
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.