KALINGA
नागपूर

नागपुरात सायबर गुन्हेगार बेलगाम; दोघांना घातला गंडा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः सायबर गुन्हेगार (Cyber criminals) बेलगाम झाले असून वेगवेगळ्या पद्धतीने नागपूरकरांना गंडा घालीत आहेत. सायबर गुन्हेगारांकडून चुना लावण्यात आल्याच्या दोन नव्या घटना एमआयडीसी व हिंगणा हद्दीत उघडकीस आल्या आहेत. (2 person looted by cyber criminals in Nagpur)

एकात्मतानगर, जयताळा येथील रहिवासी प्रशांत देशपांडे (६७) यांच्या मोबाईलवर १३ मे रोजी सायंकाळी ई-केवायसीची संदर्भात मॅसेज आला. देशपांडे यांनी मॅसेज पाठविण्यात आलेल्या क्रमांकावर फोन करून विचारणा केली. पलिकडून बोलणाऱ्याने ११ रुपये डिपॉझिट करण्यास सांगितले व त्यासाठी लिंक पाठवली. लिंकच्या आधारे ॲप डाउनलोड करून घेण्यास सांगितले. ॲप डाउनलोड करताच देशपांडे यांच्या बँक खात्यातील ७५ हजार रुपये डेबीट झाले.

हिंगण्यातील धनगरपुरा येथील रहिवासी भीमराव चामाटे (६६) यांच्या मोबाईलवर १२ जून २०२० रोजी ठगबाजाने फोन केला. पलिकडून बोलणाऱ्याने आपला परिचय रमण चौधरी असा करून देत बेंगळुरूच्या एक्साईज लाईफ इंश्युरंस कंपनीचा फंड मॅनेजर असल्याचे सांगितले. तुमच्या खात्यात लखोंचा बोनस जमा झाला असून तो मिळविण्यासाठी ३९ हजार १३८ रुपयांचाप्रिमियम भरण्यास सांगितले. विश्वास पटावा यासाठी राजकुमार व राजू चौधरी यांनीही फोन करून प्रिमियम भरण्यास सांगितले.

भीमराव यांनी फोनपेद्वारे रक्कम भरली. त्यानंतर आरोपींनी फोन उचलणे बंद केले. प्रिमियम किंवा बोनसही मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी हिंगणा ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी चौकशीअंती गुन्हा दाखल केला आहे.

(2 person looted by cyber criminals in Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: 'प्रश्नपत्रिका हव्यातच कशाला?' पेपरफुटी रोखण्यासाठी नंदन निलेकणींनी काय सुचवला जालीम उपाय?

IND vs WI 4th T20: भारत-वेस्ट इंडिजचा चौथा टी-२० सामना कुठे अन् कधी पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या!

वडिलांचा आजार…डोक्यावर कर्ज! दुष्काळाने संसारच उद्ध्वस्त

मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, राज्यसभाही सोडली; राजकारणात खळबळ

दुष्काळानं कंबरडं मोडलं, त्यात फायनान्सचं लचंड, मणकाबाईंची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

SCROLL FOR NEXT