Agriculture esakal
नागपूर

Agriculture: राज्यात २४ टक्के पाऊस तर १.६० टक्के पेरणी; पेरण्यांची घाई न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

सकाळ डिजिटल टीम

अमरावती: राज्यात अद्याप पुरेसा व पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात पावसाची शक्यता असून त्यानंतरच पेरण्यांना वेग येऊ शकणार आहे.

दरम्यान, आतापर्यंत राज्यात सरासरीच्या २४ टक्के पाऊस झाला असून १.६० टक्के क्षेत्र पेरणीखाली आले आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात मॉन्सूनचे आगमन साधारणतः सात जूनच्या दरम्यान होणे अपेक्षित होते.

यापूर्वी ११ जूनला कोकण विभागामध्ये मॉन्सूनचे आगमन झालेले आहे. २४ जूनला राज्यात बहुतांश भागात पावसाला सुरुवात झाली आहे. सद्यःस्थितीत २५ जूनअखेर सरासरी पर्जन्यमान १७३ मिमी असून प्रत्यक्षात मात्र ४१.९ मिमी (सरासरीच्या २४.२ टक्के) पाऊस पडलेला आहे.

तसेच खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र १५२.९७ लाख हेक्टर असून २४जून अखेर प्रत्यक्षात २.२६ लाख हेक्टर (१.६० टक्के) पेरणी झालेली आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात पाऊस पडल्यास राज्यात पेरणीच्या कामास वेग येईल.

खरीप हंगाम २०२३ करिता १९.२१ लाख क्विंटल बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यःस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार २१.७८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. राज्यात १४ लाख ७० क्विंटल (७६ टक्के) बियाणे पुरवठा झालेला आहे. त्यामुळे राज्यात खरीप हंगामात आवश्यक बियाणे साठा उपलब्ध आहे.

खरीप हंगाम २०२३ करिता राज्यास ४३.१३ लाख मे. टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून त्यापैकी आतापर्यंत १२.८१ लाख मे. टन खतांची विक्री झालेली आहे. सद्यःस्थितीत राज्यात २८.५० लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी. राज्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे आणि खतांचा साठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT