RTE e sakal
नागपूर

RTE मध्ये ३७०० कोटींचा घोटाळ्याचा आरोप, शाळा व्यवस्थापनाची 'HC'त धाव

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : सरकारने आरटीईच्या (RTE) अनुदानामध्ये ३७०० कोटींच्या घोटाळा (37 crore scam RTE) केल्याचा आरोप शाळा व्यवस्थापनाने केला. त्याविरोधात २५ शाळांच्या व्यवस्थापनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (nagpur bench of mumbai high court) याचिका दाखल केली आहे. निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शाळा व्यवस्थापनाने केली आहे.

आरटीई कायदा हा गरीब विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे समाजातील अनेक गरीब विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते. राज्य शासन आणि केंद्र शासन असे दोन्ही मिळून आरटीईसाठी निधी देण्यात येतो. यामध्ये केंद्र शासन ६० टक्के निधी पुरवितात, तर राज्य शासनाकडून ४० टक्के निधी दिला जातो. याचिकेनुसार, ५ वर्षांच्या कालावधीत आरटीआयच्याअंतर्गत याच शाळांनी मागविलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार म्हणतंय, की त्यांनी ४ वर्षांपूर्वी राज्याला ४ हजार ४०१ कोटी दिले. मात्र, राज्यांनी फक्त ७१७ कोटी निधी शाळांना दिला. मग उरलेला ३७०० कोटी रुपयांचा निधी कुठे आहे? असा प्रश्न शाळा व्यवस्थापनाने विचारला आहे.

गेले ४ वर्ष आम्ही ५०० मुलांना शिकवितो आहे. त्यांचे आम्हाला शुल्क मिळत नाही. शाळा चालवायची आहे. हा आलेला निधी दुसरीकडे पाठवला जात आहे. चौकशी करून आमचे पैसे आम्हाला परत करावे. या घोटाळ्याचा छडा लावावा, असे शाळांची बाजू मांडणारे वकील भानूदास कुलकर्णी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थरारक प्रसंग! आंबेनळी घाटात कार थेट 100 फूट दरीत कोसळली; 10 वर्षांच्या मुलाच्या कॉलमुळे वाचले पाच जणांचे प्राण

Kolhapur Muncipal : महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा; समन्वय ठेवा, नाराजांची समजूत काढा – रविंद्र चव्हाण

Ashes Series : २६२ धावा, २० विकेट्स! AUS vs ENG चौथ्या कसोटीत गोलंदाजांची हवा, स्टीव्ह स्मिथचा 'झापूक झूपूक' चेंडूवर दांडा गुल Video

College Student Accident: जिवलग मैत्रिणी रोजचा गाडीवरचा प्रवास, पण आजचा दिवस असा येईल वाटलं नव्हतं... भीषण अपघातात दोघींनाही मृत्यूने गाठले

Thane Crime: मानवतेला काळीमा फासणारी घटना! ७ दिवसांचं बाळ ६ लाखांत सौदा अन्...; बालतस्करीचे भयंकर वास्तव समोर

SCROLL FOR NEXT