26 lakh rupees fraud with higher educated man in nagpur  
नागपूर

मेडीकलमध्ये प्रवेश देण्यासाठी पित्याने केला जीवाचा आटापिटा, पण एक चूक झाली अन् सर्वच संपलं

अनिल कांबळे

नागपूर : मुलीला बारावीत चांगले टक्केवारी मिळाल्यानंतर तिला पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्यासाठी उच्चशिक्षित पित्याने धडपड केली. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी केली. मात्र, चार जणांच्या टोळीने त्यांना कट रचून २६ लाखांनी गंडा घातला. याप्रकरणी त्या पित्याच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. धीरज कुमार (रा.हैदराबाद), विक्की सिंग, कार्तिक ससाणे व पवार (सर्व रा.पुणे), अशी आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक नंदलाल सोनगडे (वय ५० रा. पूर्वा बिल्डिंग, लक्ष्मीनगर) हे बुलडाणा येथे महावितरणमध्ये कार्यकारी अभियंता आहेत. त्यांच्या मुलीला एमबीबीएसला प्रवेश हवा होता. डिसेंबर २०२० मध्ये धीरज सिंग याने सोनगडे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. पुण्यातील  काशीबाई नवणे महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले. सोनगडे हे धीरज याला भेटायला हैदराबादला गेले. त्याला एक लाख रुपये दिले. त्यानंतर पाच लाख रुपये धीरज याच्या बँक खात्यात जमा केले. काही दिवसांनी सोनगडे हे पुण्याला गेले. तेथे त्यांनी चौघांना २० लाख रुपये दिले. पैसे दिल्यानंतरही सोनगडे यांच्या मुलीला महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. फसवणूक झाल्याने सोनगडे यांनी बजाजनगर पोलिसांत तक्रार दिली. 

राज्यस्तरावर टोळी सक्रिय - 
मुलांना वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावावर लाखोंनी गंडा घालणारी टोळी राज्यात सक्रिय आहे. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळविण्यासाठी धडपड करीत असलेल्या मुलांचा शोध घेणे आणि त्यांना लाखोंनी गंडा घालण्याचे काम ही टोळी करते. या टोळीला वैद्यकीय महाविद्यालयामधूनच मुलांचे मोबाईल क्रमांक मिळत असल्याचा संशय आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT