Corona  Sakal
नागपूर

नागपूर जिल्‍ह्‍यात आठवडाभरात २७०९ कोरोनाबाधित

शहरात ५४९ तर ग्रामीणमध्ये ११८ नवे बाधित

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाची तिसरी लाट(covid third wave) दुसऱ्या लाटेप्रमाणेच सुरू झाली आहे. संसर्गाचा वेग १० पट वाढला आहे. तिसरी लाटेच्या संक्रमणाचा आठवडाभरात आकडा प्रचंड फुगला आहे. नागपूर जिल्ह्यात(nagpur corona update) तब्बल १४ पटीने संसर्ग वाढला आहे. आठवडाभरात बाधितांच्या संक्रमणाचा वेग वाढला असून सात दिवसांत २ हजार ७०९ बाधित आढळले. तर मागील २४ तासांत ६९१ कोरोनाबाधित आढळले. १३२ जणांना कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाची वाढती संख्या सर्वसामान्यांच्या दृष्टीने सर्वाधिक चिंतेची बाब आहे. तिसऱ्या लाटेत चाचणीत दहा रुग्णांमध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहे. प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईसोबतच त्यांच्या रॅपिड चाचणीलाही सुरवात केली आहे. शनिवारी (ता.८) शहरातून ५४९ तर ग्रामीणमधून ११८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. सुदैवाने एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. ओमिक्रॉनचे संकट उभे ठाकले असतानाच कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट कायम आहे. जिल्ह्यात संसर्गाचा उद्रेक होत असताना कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे.

कोरोनाबाधितांची दर दिवसाला आढळून येणारी संख्या लक्षात घेता बाजारपेठांमध्ये सुपरस्प्रेडरची चाचणी करण्यात येत आहे. याशिवाय बाधितांचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगवरही भर दिल्या जात असल्यामुळे दैनंदिन चाचण्यांचीही संख्या वाढली आहे. यामुळेच बाधितांचाही आकडा फुगला आहे. शनिवारी शहरात ५ हजार ९५२ व ग्रामीणमध्ये ३हजार २३१ अशा जिल्ह्यात ९हजार१८३ चाचण्या करण्यात आल्यात. यात शहरातून ५३९, ग्रामीणमधून ११८ व जिल्ह्याबाहेरील २४ अशा ६९१ लोकांचे अहवाल सकारात्मक आढळून आलेत. दिवसभरात शहरातून १११, ग्रामीणमधून ३ व जिल्ह्याबाहेरील १८ असे १३२ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने एकूण कोरोनामुक्तांची संख्या ४ लाख ८४ हजार २४ वर गेली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ व त्यातुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण हे प्रचंड कमी असल्याने सक्रिय रुग्णसंख्येत आपसूकच वाढ होत आहे.

सक्रिय कोरोनाबाधित दोन हजारांवर

महिनाभरापूर्वी जिल्ह्यात ३९ कोरोनाबाधित शिल्लक होते. आज घडिला शहरात २ हजार २१७, ग्रामीणमध्ये ३६१ व जिल्ह्याबाहेरील ३१ असे जिल्ह्यात २ हजार ६०९ सक्रिय कोरोनाबाधित आहेत. यातील काही रुग्ण मेडिकल, मेयो तसेच एम्ससह खासगी कोविड सेंटरमध्ये दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT