Blind Devotees Will Complete 521 km Wari for Vitthal Darshan: पांडुरंगाच्या ओढीने संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरच्या वाटेने निघाले आहेत. या वारकऱ्यांमध्ये यवतमाळातील तरुण दृष्टिहीन वारकरीही सहभागी होत आहेत. येथील सेवा समर्पण प्रतिष्ठानतर्फे रविवारी (ता.१५) सकाळी ९ वाजता सिद्धी विनायक मंदिरातून संत सूरदास महाराजांची पालखी घेऊन दिव्यांगांची ही वारी पंढरपूरकडे निघाली.
आमदार बाळासाहेब मांगुळकर, तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी सेवा समर्पण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत बनगीनवार, सचिव अनंत कौलगीकर, संचालक सुरेश राठी, दीपक बागडी, डॉ. अलोक गुप्ता यांच्यासह प्रा.डॉ.माणिक मेहरे, दत्ता देशपांडे, शैलेश देशकर, श्रीकांत तिखीले, स्वप्नील चांरणे, प्रलय टिप्रमवार उपस्थित होते.
येथील सेवा समर्पण प्रतिष्ठान व दिव्यांग सेवा समितीने गेल्यावर्षी प्रथमच दिव्यांगांची पायी वारी हा उपक्रम सुरू केला. सेवा समर्पणमध्ये ३० दृष्टिहीन वास्तव्यास आहेत. या दिव्यांगांना पंढरपूरच्या वारीत घेऊन जायची कल्पना सेवा समर्पण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत बनगिनवार यांनी मांडली आणि दिव्यांगांच्या वारीचा हा उपक्रम सुरू झाला.
यावर्षीसुद्धा दिव्यांगांची ही वारी संत सूरदास यांची प्रतिमा व पादुका घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीस निघाली आहे.
आर्णी, दिग्रस, पुसद, कळमनुरी, परभणी, परळी, अंबेजागाई, कुर्डूवाडी, पंढरपूर असा २२ दिवसांचा व ५२१ किलोमीटरचा पायी प्रवास असणार आहे. दररोज किमान २० ते २५ किमीचा प्रवास करणार असून, वारीच्या मार्गात भजन, कीर्तन असे कार्यक्रमही हे बांधव घेणार आहेत. या वारीत २५ दृष्टिहीन मुले आणि पाच मुली, दहा कार्यकर्ते, एकूण ४० वारकरी सहभागी झाले आहेत. या वारीसोबत तीन वाहने असून सेवा समर्पण संस्थेचे बांधव या वारीसोबत पूर्णवेळ असणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.