school vans  sakal
नागपूर

Nagpur : जीव धोक्यात घालणाऱ्या ३६ वाहनांवर कारवाई

मुलांचा जीव धोक्यात घालून वाहने चालविणाऱ्या गाड्यांवर शहरातील विविध भागात प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिस विभागाकडून सोमवारी कारवाई करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur : योग्यता प्रमाणपत्र नसतानाही शहरात बिनधास्तपणे स्कूल व्हॅन धावत आहे. मुलांचा जीव धोक्यात घालून वाहने चालविणाऱ्या गाड्यांवर शहरातील विविध भागात प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिस विभागाकडून सोमवारी कारवाई करण्यात आली. यात ३६ वाहनांनी नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई करून वाहने जप्त करण्यात आली.

स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या वाहनांचा आढावा घेण्यात आला. त्यात शहर व ग्रामीण भागातील ३ हजार ७५७ स्कूल बस व व्हॅनपैकी ७६२ वाहनांना योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) नसल्याचे पुढे आले.

याची गंभीर दखल घेऊन सोमवारपासून संयुक्त मोहीम राबविण्याचा सूचना करण्यात आल्या. त्यानुसार, सोमवारी शहरात विविध ठिकाणी स्कूल बस, व्हॅन, खासगी बस व ऑटोरिक्षाची तपासणी करण्यात आली. दिवसभरात १३ बसेस व २३ ऑटोरिक्षात दोष आढळून आल्या. या सर्व वाहनांना अडकवून ठेवण्यात आले.

ज्यांनी दंड भरला त्यांना नंतर सोडून देण्यात आले. यात १३ स्कूल बसेस जप्त करण्यात आल्या. काही ऑटोमध्ये मुलांना अक्षरशः कोंबून घेऊन जात असल्याचे आढळून आले आहे. विद्यार्थ्याची वाहतूक करताना पालकांनी वाहन चालक, वाहनाची योग्यता याची खातरजमा करावी.

कुठेही दोष आढळल्यास प्रादेशिक परिवहन विभाग किंवा संबंधित पोलिस ठाण्यात पालकांनी तक्रार द्यावी, अशा सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT