37 corona patients are no more in nagpur today  
नागपूर

भयंकर! नागपुरात मृत्यूतांडव.. आज एकाच दिवसात तब्बल ३७ जणांचा कोरोनाने मृत्यू तर इतके बाधित.. वाचा सविस्तर   

केवल जीवनतारे

नागपूर  : कोरोनाबाधितांच्या साखळीचा विस्तार कमी होण्याऐवजी अधिक गतीने वाढत आहे. यामुळे विषाणूच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा दिलासा नागपूरला इतक्यात मिळेल, अशी शक्यता दिसत नाही. कोरोनाच्या या विषाणू प्रादुर्भावाने मंगळवारी (ता.१८) आत्तापर्यंतचा उच्चांकी १०२४ असा आकडा गाठला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या पंधरा हजारापल्याड गेली आहे. तर नागपुरात आणखी ३९ बळी कोरोनाने घेतल्याने साडेपाचशे मृत्यूची नोंद झाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंत कोरोनाबाधितांच्या आकड्याने १५ हजार ६९३ नोंद केली. तर मृत्यूची संख्या ५४९ पर्यंत गेली आहे. नागपुरात मंगळवारी मेयो आणि मेडिकलमध्ये दगावलेल्या कोरोनाबाधितांमध्ये दहा ते बारा महिलांचा समावेश आहे. मेयोत चार महिला दगावल्या आहेत. 

मेयोत दगावलेल्या महाल लाकडी पुल येथील ६२, नाईक तलाव बांगला देश परिसरातील ६६ वर्षीय तर मिनीमातानगर येथील ५० आणि ताजबाग येथील ४९ वर्षीय महिलांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. याशिवाय जरीपटका येथील ७३ तर कामठी येथील रामानगरातील ७५ वर्षीय वृद्ध व्यक्तींचा मृत्यू कोरोनाने मेयोत झाला आहे. हुडकेश्वर रोड पवारनगर येथील ७९ वर्षीय, चिखली नगर येथील ५७ आणि खलाशी लाइन मोहननगर येथील ६७ वर्षीय, पाचपावली येथील ६५ वर्षीय, नंदनवन येथील६२ वर्षीय व्यक्तीचा मेयो रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

७१९६ जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात मंगळवारी २८१ जणांना कोरोनावर मात केली. ते घरी परतल्याने पाच महिन्यांच्या उपचारातून ठणठणीत बरे झालेल्यांचा आकडा ७१९६ झाला आहे. यात शहरातील ४ हजार ५७७ तर नागपूर ग्रामीण भागातील २ हजार ६१९ रुग्ण आहेत. सध्या नागपुरातील मेयो, मेडिकल, एम्ससह कोविड सेंटरमध्ये सुमारे ६ हजार ३२५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. यातील शहरातील ५ हजार १५ तर ग्रामीण भागातील १३१२ कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

सामाजिक न्याय विभागातही शिरकाव

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले. यामुळे येथील अधिकारी कर्मचारी यांनी धास्ती घेतली. निवडक कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- कोरोनाचे मेडिकलमध्ये २६३ मृत्यू
- मेयोत कोरोनाचे २५१ मृत्यू
- खासगी रुग्णालयात ३३ मृत्यू
- कोरोनातून बरे होण्याचा दर घसरला
- महिलांच्या मृत्यूंची संख्या वाढतेय
- नागपुरात पाऊणे दोन लाखांवर चाचण्या

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Red object in galaxy : अवकाशात दिसले रहस्यमयी लाल ठिपके, पृथ्वीवर होणार गंभीर परिणाम? नेमका विषय काय, जाणून घ्या..

Anurag Thakur : सशक्त भारतासाठी मोदींची पंचसूत्री आवश्‍यक; माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

Latest Marathi News Updates : पुलावरून वाहत्या पाण्यातून तहसीलदारांनी टाकली गाडी

Maharashtra Politics: आता पालकमंत्री नसलात तरी…; ८ महिन्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ‘पॉवर शिफ्ट’ निर्णय, पण मित्रपक्षांना धक्का

भारतीय संगीतकारांनी केलेली मोठी चूक ! भरपाई म्हणून ऑफर केलं पाकिस्तानी गायिकेला गाणं; आजही आहे सुपरहिट

SCROLL FOR NEXT