54-year-old man dies as SRPF jawan slaps him during argument over car headlight in nagpur  sakal
नागपूर

Nagpur Crime : कारच्या हेडलाईटवरून वाद, SRPF जवानाने चापट मारल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; नागपुरातील घटनेने खळबळ

रोहित कणसे

नागपूर : नागपूर शहरात राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) जवानाने एक ५४ वर्षीय व्यक्तीला चापट मारल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसआरपीएफ जवानाने कारच्या हेडलाइटवरून झालेल्या वादात एका ५४ वर्षीय व्यक्तीला चापट मारली. यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली. आरोपी निखिल गुप्ता (३०) हा त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी आला असताना गुरुवारी रात्री वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत माता मंदिर परिसरात ही घटना घडली.

गुप्ता हे त्यांची कार पार्क करत असताना, त्याच परिसरातील रहिवासी असलेल्या पीडित मुरलीधर रामरावजी नेवारे यांच्या चेहऱ्यावर कारचा हेडलाइट बीम पडला. यानंतर नेवारे यांनी गुप्ता यांना लाईट बीम कमी करण्याची विनंती केली. परंतु SRPF जवान गुप्ता हे यामुळे चांगलेच संतप्त झाले. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि गुप्ता यांनी जोरदार चपराक मारल्याने नेवारे जमिनीवर कोसळले.

त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आले मात्र शनिवारी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. पोलिसांनी गुप्ता विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT