59 lakh difference in cleaning of municipal drains 
नागपूर

महापालिकेच्या नाले सफाईत 59 लाखांची तफावत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा नाले सफाईचा खर्च निम्मा झाल्याचा दावा महापालिका प्रशासनानेच केला. त्यामुळे मागील वर्षी भ्रष्टाचार झाला की यंदा नाले सफाईच्या नावावर अनेक नाल्यातून केवळ जेसीबी फिरवले? असे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. मागील वर्षी नाले सफाईवर 1 कोटी 2 लाख तर यंदा केवळ 43 लाख 79 हजार रुपये खर्च झाले. 


कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाउनचा फायदा घेत नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील नदी व नाले सफाई मोहिम हाती घेण्यात आली. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांची सफाई होत आहे. शहरातील एकूण 227 नाल्यांपैकी आतापर्यंत 211 नाल्यांची सफाई पूर्ण झाली असून उर्वरित 16 नाल्यांपैकी 15 नाल्यांची सफाई सुरू असून प्रलंबित एका नाल्याचीही सफाई लवकरच पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे नाले सफाईवर यंदा केवळ 43 लाख 79 हजार 280 रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

मागील वर्षीच्या खर्चाच्या तुलनेत हा निधी केवळ 43 टक्‍के आहे. मागील वर्षी नाले सफाईकरिता 1 कोटी 33 लाख 30 हजार 360 रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला होता. त्यापैकी 1 कोटी 2 लाख 95 हजार 618 रुपये खर्च करण्यात आले होते. अर्थात मागील वर्षी 227 नाल्यांच्या सफाईसाठी यंदाच्या तुलनेत 59 लाख 16 हजार रुपये अधिक खर्च करण्यात आले. खर्चातील या तफावतीमुळे विविध तर्क वितर्क लावले जात आहे.

यंदा जी कामे 43 लाख 79 हजारांत होत आहे, त्यासाठी मागील वर्षी 1 कोटी 2 लाख कसे खर्च झाले? यावर आता चर्चा सुरू झाली. एवढेच नव्हे केवळ 43 लाख 79 हजारांत नाले सफाई शक्‍य नसून काही नाल्यांच्या स्वच्छतेला तर बगल दिली नाही ना? असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मनपाच्या सहा आणि भाडेतत्वावर आठ अशा एकूण 14 जेसीबीद्वारे सफाईचे काम सुरू आहे. याशिवाय मनुष्यबळाद्वारे लहान नाल्यांची सफाई केली जात आहे. 


एकूण नाले : 227 
सफाई झालेले नाले : 211 


झोननिहाय नाल्यांची सफाई 
झोन नाल्यांची संख्या सफाई झालेले नाले 
लक्ष्मीनगर 22 20 
धरमपेठ 35 30 
हनुमाननगर 14 13 
धंतोली 14 14 
नेहरूनगर 15 14 
गांधीबाग 51 50 
सतरंजीपुरा 22 22 
लकडगंज 07 06 
आशीनगर 18 17 
मंगळवारी 29 25 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवाजी पार्कसाठी ठाकरे बंधू अन् भाजप-शिंदेसेनेचाही अर्ज, एकच तारखा; कुणाला मिळणार परवानगी?

Crime News: काकाच्या हत्येचा बदला? नमाजानंतर चाकूहल्ला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल ठार, जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट!

Latest Marathi News Live Update : राज्यात ढगाळ हवामान, किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता

भाविकांसाठी बातमी! विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन तीन दिवस राहणार बंद; मूर्तीवर लवकरच हाेणार रासायनिक प्रक्रिया..

BJP–AIMIM Alliance: ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे घोषवाक्य देणाऱ्या भाजपची AIMIM सोबत युती, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

SCROLL FOR NEXT