7 thousand tuberculosis patients found even after survey stop in nagpur 
नागपूर

कोरोनाने थांबविले क्षयाचे सर्वेक्षण, तरीही ७ हजारांवर क्षयग्रस्त; दोन वर्षांत ४०७ मृत्यू

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनाचे आणि क्षयाचे लक्षण काहीशी सारखी आहेत. यामुळे कोरोना लपविण्यासाठी क्षयाच्या संशयितांनीही तपासणी केली नाही. सर्वेक्षणाचेही काम ठप्प पडले. मात्र, यानंतरही उपराजधानीसह नागपूरच्या ग्रामीण भागात तब्बल ७ हजार ३३८ क्षयग्रस्त आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागात ५१ एमडीआर क्षयबाधितांपैकी ४८ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. तर शहरात दोन वर्षात क्षयाच्या बाधेने ४०७ जण दगावले आहेत. 

नागपूर जिल्ह्यात क्षयरोग वाढत आहे. जिल्ह्यात साडेसात हजारावर क्षयग्रस्तांची नोंद झाली आहे. क्षयाचे उच्चाटन करण्यासाठी सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत सीबी नेट उपकरण उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सध्या कोविडमुळे मेयो रुग्णालयातील सीबीनेट उपकरणावर क्षयाची चाचणी होत नसल्याची तक्रार इंटकतर्फे करण्यात आली आहे. विशेष असे की, मेडिकलमधील सीबीनेट यंत्र कोरोनाच्या चाचणीसाठी वापरण्यात येत असल्याचे उघडकीस आले. यामुळे दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी वर्षभर क्षयाच्या चाचणी करण्याला 'खो' दिला आहे. महापालिकेत सदर येथील रुग्णालयात एस सीबीनेट यंत्र लावण्यात आले आहे. 

मनपाने लक्ष द्यावे - 
महापालिकेच्या नोंदीत वर्षभरात ५ हजार ३६५ क्षयग्रस्त आढळून आले आहेत. यात १११ जणांचा मृत्यू झाला. २०२१ मध्ये जानेवारी ते मार्च या अडिच महिन्यात सुमारे १ हजार २८३ क्षयग्रस्त आढळून आले आहे. यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२५ मध्ये क्षयाचे उच्चाटन करण्याचा सोडलेला संकल्प पूर्ण होणे अशक्य आहे. विशेष म्हणजे शहरातील ३० लाखाच्या लोकसंख्येसाठी केवळ एक सीबीनेट महापालिकेजवळ आहे. 

प्रशासनाचा नकार - 
नागपुरात २०१८ मध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मदतीने क्षयरुग्णांचे सर्वेक्षण केले असता, ९हजार ८५३ रुग्ण आढळून आले होते. यात ५११० रुग्णांनी शासकीय रुग्णालयांमधून तर ४ हजार ७४३ रुग्णांनी खासगी इस्पितळांमधून उपचार घेतले होते, असे आढळून आले होते. परंतु, कोरोनाच्या काळात संपूर्ण मनुष्यबळ कोरोना उपचारासाठी वळवण्यात आले. यामुळे सर्वेक्षणाचे काम ठप्प पडले, मात्र प्रशासनाने हे होत नसल्याचे सांगितले.  

कोविड-१९ आणि क्षयरोगाची लक्षणे मिळतीजुळती आहेत. ही लक्षणे असलेल्या व्यक्तींनी ही लक्षणे न लपविता क्षयरोगाची तपासणी करून घ्यावी. शासनाकडून क्षयरुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात योजना सुरू केल्या आहेत. याचा लाभ त्यांनी घ्यावा. क्षयरोग पूर्णपणे बरा होतो. यामुळे घाबरू नका. रुग्णालयाशी संपर्क साधावा. 
-डॉ. ममता सोनसरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, नागपूर. 

वर्षनिहाय क्षयबाधित - 

वर्ष रुग्ण
२०१८ ९८५३
२०२० ५३६५
२०२१ (जाने. ते मार्च)  १२८३ 
  • -क्षयरोग आनुवंशिक नाही 
  • -ट्यूबरक्‍यूलेसिस बॅसीलाय जिवाणूमुळे होतो 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Doctor Case: 'गाेपाल बदने, प्रशांत बनकरच्‍या पोलिस कोठडीत वाढ'; फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी न्यायालयात नेमकं काय घडलं?

Sweet Corn Appe Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा कुरकुरीत स्वीटकॉर्न अप्पे, सोपी आहे रेसिपी

आता नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतून! महापालिका निवडणुकीत 9 लाख तर झेडपीसाठी उमेदवारांना करता येणार 7.50 लाखाचा खर्च; पंचायत समितीसाठी 5.25 लाखांची मर्यादा

‘रन फॉर युनिटी’मध्ये आज सगळेच पोलिस धावणार! प्रत्येक पोलिस ठाण्याला फोटो, व्हिडिओ अपलोड करण्याची घातली अट; पोलिसांकडून टी-शर्ट, फलकांची खरेदी

आजचे राशिभविष्य - 31 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT