85 years old man still teaching dandpatta to youth in village  
नागपूर

Video: वय तब्बल 85 वर्ष पण ते आजोबा करतात तरुणांनाही लाजवेल असे काम.. व्हिडिओ बघून तुम्हीही व्हाल थक्क.. 

नरेंद्र चोरे

नागपूर: काही दिवसांपूर्वी हडपसर (पुणे) येथील दांडपट्टा खेळणाऱ्या 85 वर्षीय शांताबाई पवार या आजीबाईंचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर या व्हिडीओने चांगलीच धूम केली होती. या आजीबाईवर आलेली परिस्थिती आणि त्यांची कला बघून गृहमंत्र्यांनी त्यांच्यासाठी मदतीची घोषणा केली होती. आता नागपूरचे 85 वर्षांचे आजोबाही त्यांच्या अनोख्या कलेमुळे चांगलेच चर्चेत आहेत. 

पारशिवनी तालुक्यातील बोरी, कन्हान (सिंगारदीप) येथील वस्ताद रामचंद्र राऊत हे 85 वर्षांचे आहेत. चेहऱ्यावर सुरकुत्या आणि किरकोळ शरीरयष्टी असली तरी, त्यांच्यात अजूनही तितकाच जोश आहे. या वयातही ते तेवढ्याच वेगाने व सफाईदारपणे दांडपट्टा व लाठीकाठी फिरवितात. शेतकरी असलेले राऊत वयाच्या 15 व्या वर्षांपासून लाठीकाठी व दांडपट्टा खेळत आहेत. हे आजोबा सध्या जोरदार चर्चेत आहेत.

युवक युवतींना शिकवतात दांडपट्टा 

मधल्या काळात ते या शस्त्रकलेपासून थोडे दूर गेले होते. मात्र नागपुरातील शिवशक्ती आखाड्याची शाखा गावात सुरू झाल्यापासून ते पुन्हा नियमितपणे दांडपट्टा खेळू लागले. दिवसभर गावाच्या वेशीवर बकऱ्या चारल्यानंतर सायंकाळी ते आखाड्यात येतात. गावातील युवक युवतींना कला शिकवतात. दांडपट्टा, लाठीकाठी, तलवार, भाला इत्यादी कलेत तरबेज असलेले हे आजोबा केवळ शिवकालीन युद्धकलेचेच प्रदर्शन करीत नाही, तर युवापिढीला तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊन ही प्राचीन शस्त्रकलादेखील जोपासत आहेत.

मुलींनीही ही कला आत्मसात करावी

त्यांच्या मार्गदर्शनात अनेक खेळाडू घडले आणि घडताहेत. बोरी गावात दांडपट्टा खेळणारे ते एकमेव व्यक्ती आहेत हे विशेष. त्यामुळे त्यांच्या या कलेची पंचक्रोशीत चर्चा आहे. राऊत यांनी केवळ गावातील तरुणांनाच दांडपट्टा व लाठीकाठी शिकविली नाही. त्यांनी आपल्या नातवंडांनाही या कलेत तरबेज बनविले आहे. उल्लेखनीय म्हणजे अनेक मोठ्या व्यक्तींना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. आजच्या काळात स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मुलींनीही ही कला आत्मसात करावी, असा त्यांचा आग्रह आहे. गावात आखाडा सुरू करून खंडीत परंपरेला पुनरुज्जीवीत केल्याबद्दल त्यांनी तरूणाईलाही धन्यवाद दिले.

आखाड्यांना नवसंजीवनी देणे आवश्यक
पूर्वीच्या काळात गावागावांमध्ये आखाडे असायचे. त्यात तरुण मुळे कुस्त्या, लाठीकाठी व दांडपट्टा शिकायचे. मात्र काळाच्या ओघात आखाडे बंद झाले. त्यामुळे युवापिढीही या प्राचीन शस्त्रकलेपासून दूर गेली. सुदृढ युवा पिढी घडवायची असेल तर, या आखाड्यांना नवसंजीवनी देणे आवश्यक आहे. 
-रामचंद्र राऊत,
 शिवशक्ती आखाडा, बोरी 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ceasefire: इस्रायलकडून बेरूतवर मोठा हवाई हल्ला; ८० जणांचा मृत्यू, १०० लोक जखमी, इराणकडून होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर बंदी

Shaktipeeth Highway On Raju Shetti : शक्तिपीठ महामार्गाच्या नवीन नकाशाला राजू शेट्टींचा विरोध, सांगली, कोल्हापुरातून पुन्हा आंदोलन पेटणार

MPSC Success Suraiya Desai : संसार सांभाळत स्पर्धा परीक्षेत यश; कोल्हापुरची सुरैया देसाईं महिलांमध्ये राज्यात प्रथम

Pune water supply news: पुण्यात १५ टक्के पाणी कपात टाळण्यासाठी गळती रोखण्याचा महापालिकेचा प्रयत्न; समान पाणी पुरवठा योजना व स्मार्ट मीटरवर भर

Mehkar Lonigavli POCSO Case: लोणी गवळी शाळेत तिसरीतील मुलींचा विनयभंग करणारा मास्तर ग्रामस्थांच्या ताब्यातून पोलिसांच्या स्वाधीन; जिल्ह्यात संतापाची लाट

SCROLL FOR NEXT