90 percent corona positive patients who refer from private to government are died in nagpur
90 percent corona positive patients who refer from private to government are died in nagpur 
नागपूर

रात्रीस खेळ चाले! खासगीतून हलविलेल्या ९० टक्के कोरोनाबाधितांचा मृत्यू

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनाचा शिरकाव होताच साऱ्या खासगी रुग्णालयांनी खासगी रुग्णसेवा बंद केली. कोरोनावरील उपचारासाठी एकही खासगी डॉक्टर पुढे आले नाही. मात्र, खासगी रुग्णालयांना कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी मिळाली. खासगी रुग्णालये उपचार करू लागली. मात्र, कोरोनाचा रुग्ण गंभीर होताच मेडिकल, मेयोत रेफर करण्यात येत होती. विशेष असे की, रेफर करण्याची वेळ मध्यरात्रीनंतरची होती. रेफर करण्याचा हा रात्रीस खेळ चाले. मृत्यू कमी दाखवण्याची खासगी रुग्णालयांची क्लृत्पी ओळखता आली नाही. मृत्यूचा टक्का वाढल्यानंतर खासगीचे खरे रुप मेडिकल, मेयो प्रशासनाला दिसले. 

लवकर बरे व्हावे, या हेतूने अनेक कोरोनाबाधित रुग्ण खासगीतील उपचाराला पसंती देतात. परंतु, खासगीत उपचार करताना पैसा संपल्यानंतर मात्र रुग्णाला गंभीर स्थितीत मेडिकल-मेयोत रेफर केले जात होते. खासगी रुग्णालयाच्या अ‌ॅम्बुलन्समधून मध्यरात्रीनंतर रुग्णाची स्थिती गंभीर झाल्याचे कारण पुढे करीत रेफर करण्यात येत होते. उपचार खासगीत मृत्यू मात्र मेयो-मेडिकलमध्ये होत असल्याने मेयो, मेडिकलमधील मृत्यूच टक्का वाढला. यामुळे ही चिंता जिल्हा प्रशासनानेही व्यक्त केली. यानंतर खरा प्रकार पुढे आला. मध्यरात्री एका रुग्णालयातून दर दिवसाला कोरोनाचा एक रुग्ण रेफर करण्यात येत होता. त्या रुग्णाचा पुढे अवघ्या काही तासांमध्ये किंवा एक दिवसानंतर मृत्यू होत होता. मेडिकलमध्ये कोरोनाचे १ हजार ६५३ मृत्यू झाले. यातील रेफर करण्यात आलेल्या ३१५ कोरोनाबाधितांपैकी २८३ मृत्यू हे खासगी रुग्णालयातून रेफर करण्यात आलेल्या कोरोनाबाधितांचे आहेत. तर ३१६ कोरोनाबाधित मृतावस्थेत मेडिकलमध्ये आणण्यात आले. मात्र, मृत्यूची नोंद मेडिकलमध्ये झाल्याने, येथील मृत्यूचा टक्का वाढला असल्याचे दाखवण्यात आले. हीच स्थिती मेयो रुग्णालयातील आहे. मेयोत १ हजार १५९ मृत्यू झाले असून यातील २४० मृतावस्थेत मेयोत आले. तर अडीचशेवर मृत्यू हे रेफर करण्यात आलेल्या कोरोनाबाधितांचे असल्याची माहिती पुढे आली आहे. 

केंद्रीय पथकाच्या निदर्शनास -
खासगी रुग्णालयांना कोरोनाचा नव्हेतर इतरही आजाराचे रुग्ण हलवताना कोणतेही नियम महापालिकेने घालून दिले नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. यामुळेच केंद्रीय आरोग्य पथकाच्या निदर्शनात हा प्रकार मेडिकल- मेयोच्या रुग्णालय प्रशासनाकडून आणून देण्यात आला. यानंतर याची दखल घेण्यात आली. मेयोतही अडीचशेच्या वर खासगीतून रेफर झालेल्यांचे मृत्यू झाल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले. 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT