नागपूर

भाजपच्या माजी आमदाराला काँग्रेसचा हात?

राजेश चरपे - सकाळ वृत्तसेवा

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी त्यांची बातचितसुद्धा झाल्याचे कळते.

नागपूर: पक्षात राहून सांगताही येत नाही आणि सहनही होत नसल्याने शहरातील भाजपच्या एका माजी आमदाराने काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी त्यांची बातचितसुद्धा झाल्याचे कळते.

ठरल्याप्रमाणे सर्व काही झाल्यास महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मोठा धमाका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या संबंधित आमदार या विषयावर बोलायला काहीही तयार नाही. राजकारणात अशा अफवा पसरवल्या जातच असतात असे त्यांचे म्हणणे आहे. राज्यातील पाच वर्षांच्या सत्तेनंतर भाजपने विधानसभेची उमेदवारी वाटप करताना अनेकांना धक्के दिले होते. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापले होते. बड्या नेत्यांची नावे असल्याने भाजपच्या या आमदाराची तेव्हा फारशी राजकीय वर्तुळात चर्चा झाली नव्हती. मात्र त्यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करून नाराजी व्यक्त केली होती. जुन्या मित्राला गिफ्ट देण्यासाठी आपला बळी दिल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांचा रोख तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडे होता.

भाजपात राहून पुनर्वसन होण्याची कुठलीही शक्यता नाही. कोणी दखलही घेत नाही आणि बैठकांनासुद्धा बोलवत नसल्याने ते सध्या प्रचंड अस्वस्थ आहेत. असेच सुरू राहिल्यास राजकीय अस्तित्वच संपण्याची शक्यता असल्याने त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला आपली ताकद दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे समजते. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विस्तारासाठी इनकमिंग फ्री केले आहे. त्यामुळे काँग्रेसही काही मोठ्या नेत्यांच्या शोधातच आहे. त्यात माजी आमदाराच येत असले काँग्रेसलाही ते हवेच आहे.

'वेट अँड वॉच'

एखाद्या बड्या नेत्याला पक्षात घेताना त्याच्या खास समर्थकांनाही सामावून घ्यावे लागते. प्रत्येकाचे समाधान कसे करायचे हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी व नेत्यांमध्येही रोष निर्माण होतो. पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत दावेदार वाढतात, असा सर्व पेच आहे. त्यामुळे 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत सध्या संबंधित आमदार असल्याचे कळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT