नागपूर

'खोडा टाकण्याची काँग्रेसची परंपराच'; महापालिकेतील सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांची टीका

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : स्वतः काही करायचे नाही आणि दुसरे करीत असल्यास खोडा टाकायचा ही काँग्रेसची परंपरा आहे. तीच परंपरा नगरसेवक प्रफुल गुडधे पुढे चालवत असल्याचा पलटवार महापालिकेतील सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी केला. (Aavinash thakre criticized nagpur congress)

महापालिकेच्या स्वनिधीतून लस घेण्याची महापौरांची घोषणा संवग लोकप्रियता असल्याचे सांगून गुडधे यांनी खुल्या बाजारातून लसी घेताच येत नसल्याचा आरोप केला होता. त्यास आज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. गुडधे यांनी केलेले आरोप वस्तुस्थितीला धरून नाही.

कोरोनाला लवकर आटोक्यात आणायचे असल्यास लसीकरण तातडीने होणे आवश्यक आहे . केंद्रसरकार सर्व नागरिकांसाठी मोफत लस उपलब्ध करून देणारच आहे, परंतु ज्यांना कुणाला लवकर लसीकरण करायचे आहे त्यांच्या करीता एकूण लसीमधील ५० टक्के वाटा राज्यसरकारला आणि खुल्या बाजारात विकण्याकरिता केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.

याच धोरणानुसार महापालिकेने लस घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी महापौरांनी सर्वपक्षीय प्रमुखांची बैठक घेतली होती. त्यास गुडधेसुद्धा उपस्थित होते. महापालिका आयुक्तांच्या माध्यमातून प्रधान सचिवांशी चर्चा केली. सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतरच निर्णय जाहीर केला आणि मुख्यामंत्र्यांना पत्र पाठवल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यामंत्र्यांनी प्रासंगिकता ओळखून हे पत्र पुढील कारवाई करीता आरोग्य मंत्रालय आणि नगरविकास खात्याकडेसुद्धा पाठविले आहे. या विषयाला राज्यसरकारने मंजुरी दिली तर त्याचे श्रेय नागपूर महानगर पालिकेत सत्तारूढ असलेल्या भाजपाला जाईल. या नकारात्मक भावनेतून त्यांनी विरोध दर्शवला असावा. प्रफुल गुडधे यांनी नागरिकांना भ्रमित करण्यासाठी राजकीय आरोप करण्यात वेळ घालवू नये. त्यांच्या पक्षाचे सरकार राज्यात आहे. सरकारकडे पाठपुरावा करून लसींसाठी परवानगी मिळून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही अविनाश ठाकरे यांनी केले.

(Aavinash thakre criticized nagpur congress)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT