Abu Azmi criticized maharashtra government on Sachin waze Rejoining  
नागपूर

"वाझेला सेवेत घेणे सरकारची मोठी चूक; म्हणूनच वाढल्या अडचणी" 

राजेश चरपे

नागपूर ः ख्वाजा युनूसच्या खुनाचा आरोप असतानाही वाझे यास पुन्हा पोलिस सेवेत परत घेणे ही महाविकास आघाडी सरकारची सर्वात मोठी चूक होती. या चुकीमुळे सरकार अडचणीत आले आहे, असे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आजमी यांनी म्हटले आहे.

एक खासगी कार्यक्रमासाठी आजमी नागपूरला आले होते. नागपूर विमानतळावर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. ख्वाजा युनूस रहस्यमरित्या गायब झाला आहे. त्याचा खून झाल्याची चर्चा असून वाझे याची या प्रकरणात संशयास्पद भूमिका आहे. तब्बल सोळा वर्षे निलंबित ठेवल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने त्याला परत सेवेत घेतले. याची माहिती मिळताच आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन ही चूक निदर्शनास आणून दिली. मात्र परवीरसिंग यांच्या सल्ल्यानेच वाझे याला सेवेत घेण्यात आल्याचा दावाही आजमी यांनी केला.

भाजपने ज्या दिवशी वाझेचा विषय उकरून काढला त्याच दिवशी त्याला निलंबित करणे आवश्यक होते. वाझे हा वादग्रस्त अधिकारी आहे. त्याचे चरित्र पहिलेपासूनच वाईट आहे. मी महाविकास आघाडीसोबत आहे. असे असले तरी वाझेला पुन्हा सेवेत घेण्याला आपला सुरुवातीपासूनच विरोध होता. त्याला सेवेत घेण्याविषयी परमबीरसिंग आग्रही होते. त्यांच्या सल्ल्यानेच गृहविभागाने वाझेला सेवेत घेऊन वाद ओढवून घेतला. आता परमबीरसिंगही सरकारवर उलटले असल्याचे अबू आजमी यांनी सांगितले.

तत्पूर्वी नागपूर विमानतळावर अबू आजमी यांचे सपाचे प्रदेश अध्यक्ष अजय खानोरकर, जिल्हाध्यक्ष रविकांत खोब्रागडे, शहराध्यक्ष टी.ए. खान, महिलाध्यक्ष ममता तिवारी, उपाध्यक्ष नीलकंठ काचेवार, महासचिव परवेज सिद्दिकी, महासचिव इतहार खान, सचिव एजाज खान , मुस्ताक खान, माया चवरे आदींनी स्वागत केले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decision: शहरात उपचार सोपे, गावात सुविधा वाढणार... मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोककेंद्रित महत्त्वाचे निर्णय!

Pune Traffic: चांदणी चौकात महामार्ग ओलांडताना जीवघेणी कसरत; प्रवाशांची गैरसोय : पादचारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : भुजबळ साहेब लवकर बरे व्हा, खासदार सुप्रिया सुळे यांची पोस्ट

IPL 2026 Update: काव्या मारनचा धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, असं करण्याची खरच गरज आहे का? सनरायझर्स हैदराबाद...

जगात कुठं असं होतं का? प्रकल्प रखडल्यानं फडणवीस कंत्राटदारांवर संतापले, म्हणाले, १५ दिवसात पूर्ण करा

SCROLL FOR NEXT